औरंगाबादहून धावणार ३ नव्या रेल्वेगाड्या
By Admin | Updated: August 31, 2014 00:41 IST2014-08-31T00:37:05+5:302014-08-31T00:41:08+5:30
औरंगाबाद : औरंगाबादहून आता तीन नव्या रेल्वेगाड्या धावणार आहेत.

औरंगाबादहून धावणार ३ नव्या रेल्वेगाड्या
औरंगाबाद : औरंगाबादहून आता तीन नव्या रेल्वेगाड्या धावणार आहेत. यामध्ये दोन साप्ताहिक एक्स्प्रेस औरंगाबादहून तर एक साप्ताहिक एक्स्प्रेस औरंगाबादमार्गे धावणार असून रेल्वेच्या वतीने सप्टेंबरपासून काही रेल्वेंच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला.
दक्षिण मध्य रेल्वेतर्फे औरंगाबाद- रेनिगुंठा- औरंगाबाद साप्ताहिक एक्स्प्रेस, हुजूरसाहेब नांदेड- औरंगाबाद- हुजूरसाहेब नांदेड आणि काजीपेठ- लोकमान्य टिळक टर्मिनस- काजीपेठ ही औरंगाबादमार्गे साप्ताहिक एक्स्प्रेस या नवीन वेळापत्रकात जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद- रेनिगुंठा साप्ताहिक एक्स्प्रेस बीदर, रायचूर, कडप्पामार्गे धावेल, तर काजीपेठ- लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्स्प्रेस मंचिरयाल, आदिलाबाद, नांदेड, औरंगाबादमार्गे धावणार आहे. तसेच नगरसोल- नरसापूर, नगरसोल- हुजूरसाहेब नांदेड, हुजूरसाहेब नांदेड- मनमाड, मनमाड- काचीगुडा या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यामध्ये काही गाड्या सध्याच्या नियोजित वेळेच्या दहा मिनिटे ते अर्धा तास आधी, तर काही गाड्या जवळपास २० ते ३५ मिनिटांनंतर धावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.