३ लाख १४ हजार पाठ्यपुस्तके उपलब्ध
By Admin | Updated: May 21, 2014 00:17 IST2014-05-20T23:53:46+5:302014-05-21T00:17:40+5:30
उस्मानाबाद : सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात.

३ लाख १४ हजार पाठ्यपुस्तके उपलब्ध
उस्मानाबाद : सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. उस्मानाबाद तालुक्यातील पहिली ते आठवीच्या वर्गातील ५३ हजार ६४१ विद्यार्थ्यांसाठी ३ लाख १४ हजार पुस्तके उपलब्ध झाली आहेत. सदरील पाठ्यपुस्तकाचे शाळा व केंद्र्रनिहाय वाटप सुरु करण्यात आले आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकासोबतच गणवेश वाटप, शाळा बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन दिला जातो. यंदाही पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप केले जाणार आहे. उस्मानाबाद तालुक्यात मराठी माध्यमाचे ३९ हजार ३८८, उर्दू माध्यमाचे ४ हजार २५३ अशा एकूण ५३ हजार ६४१ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ दिला जाणार आहे. जि.प. आणि खाजगी अनुदानीत शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी सदरील पुस्तके वितरित केली जाणार आहेत. दरम्यान, सदरील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ३ लाख १४ हजार पुस्तके उपलब्ध झाली आहेत. त्यानुसार शाळा स्तरावर वाटपही सुरु झाले आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी के.एच. सोनवणे यांनी दिली. विस्तार अधिकारी प्रदीप मोकाशे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष साधन व्यक्ती नागनाथ लोखंडे, विनोद जानराव, नितीन डोके, भुजंग वाघे पुस्तक वाटपाचे काम करीत आहेत. (प्रतिनिधी)