3 क्ंिवटल गुटखा साठा पडून

By Admin | Updated: July 20, 2014 00:29 IST2014-07-20T00:05:26+5:302014-07-20T00:29:24+5:30

जालना : येथील अन्न व औषधी प्रशासन तसेच पोलिस विभागाच्या वतीने मागील काही महिन्यांपूर्वी केलेल्या विविध कारवाईत कोट्यवधीचा गुटखा जप्त केला आहे.

3 Kgital Gutka reserves fall | 3 क्ंिवटल गुटखा साठा पडून

3 क्ंिवटल गुटखा साठा पडून

जालना : येथील अन्न व औषधी प्रशासन तसेच पोलिस विभागाच्या वतीने मागील काही महिन्यांपूर्वी केलेल्या विविध कारवाईत कोट्यवधीचा गुटखा जप्त केला आहे. तो नष्ट करण्यासाठी प्रशासनाला अद्याप मुहूर्त लागत नसल्याने तो साठा कार्यालयात पडून आहे.
शासनाने गुटखा बंदी केलेली असतानाही जालना शहरात व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटका विक्री चोरीछुपे चालू आहे. मागील काही महिन्यांपासून पोलिस विभाग व अन्न व औषधी प्रशानाने संयुक्तपणे कारवाई केली.
त्यात तीन ते चार मोठ्या कारवाया केलेल्या आहेत. या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा, सुंगधी तंबाखू आदींचा साठा जप्त केलेला आहे. असा सुमारे तीन क्विंटलच्यावर कोट्यवधी रूपयांचा माल या कार्यालयाकडे तसेच एका खासगी कंपनीच्या गोडावूनमध्ये सीलबंद आहे. तो अद्याप कार्यालयाने नष्ट केलेला नाही. (प्रतिनिधी)
कार्यालयात गुटख्याचाच वास
अन्न व औषधी प्रशासनाच्या कार्यालयातच एका खोलीत या तीन क्विंटल साठ्या पैकी काही साठा ठेवलेला आहे. या साठ्याचा कार्यालयात घुसताच वास येतो. कर्मचाऱ्यांनाही त्याचा मोठा त्रास होतो. तसेच हे कार्यालय ज्या वस्तीत आहे. त्या गल्लीतील नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे जप्त केलेला माल माल करण्यासाठी आर्थिक तरतूद नाही. आम्हालाच स्वखर्चाने तशी तरतूद करावी लागते. तसेच गुटखा नष्ट करण्यासाठी नगरपालिका व प्रदूषण महामंडळाचेही परवानगी आवश्यक आहे.ती मिळताच गुटखा नष्ट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: 3 Kgital Gutka reserves fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.