शासकीय दंत महाविद्यालयाची ३ कोटींची यंत्रसामग्री अडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:28 IST2020-11-12T07:28:11+5:302020-11-12T07:28:11+5:30

औरंगाबाद : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने यंत्रसामग्रीसाठी ३ कोटींचा निधी हापकीन मंडळाकडे वर्ग केला आहे; परंतु महिनोन्‌महिने यंत्रांची ...

3 crore machinery of government dental college stuck | शासकीय दंत महाविद्यालयाची ३ कोटींची यंत्रसामग्री अडकली

शासकीय दंत महाविद्यालयाची ३ कोटींची यंत्रसामग्री अडकली

औरंगाबाद : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने यंत्रसामग्रीसाठी ३ कोटींचा निधी हापकीन मंडळाकडे वर्ग केला आहे; परंतु महिनोन्‌महिने यंत्रांची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

शासकीय दंत महाविद्यालयाने हापकीनला पिजो सर्जिकल युनिट, डायो लेझर, डेंटल चेअर आदी यंत्रसामग्रीसाठी ३ कोटींचा निधी वर्ग केला आहे; परंतु त्यांचा पुरवठाच होत नसल्याची स्थिती आहे. गतवर्षी डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाच्या (डीसीआय) पथकाने पाहणी करताना यंत्रसामग्रीच्या त्रुटींवर बोट ठेवले होते. त्यांची पूर्तता वर्षभरात करणे गरजेचे होते. नव्याने पाहणीची वेळ आली तरी रुग्णालयासाठी यंत्रे आली नाहीत. ऑक्टोबरअखेर ‘डीसीआय’च्या पथकाने पाहणी केली. या पाहणीत पथकातील अधिकाऱ्यांनीही पुन्हा एकदा यंत्रसामग्रीच्या त्रुटींवर बोट ठेवले. दोन वर्षांपासून ही त्रुटी दूर होत नसल्याने ‘डीसीआय’ काय पाऊल उचलते, याकडे महाविद्यालय प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात मराठवाडा आणि लगतच्या भागांतून दंतोपचारासाठी रुग्ण येतात. येथील उपचार सुविधा वाढण्यासाठी निधी मिळून आणि हा निधी यंत्र खरेदीसाठी देऊनही त्यांची नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्याचा फटका रुग्णसेवेसह विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसत आहे.

हापकीनकडे पाठपुरावा सुरू

अधिष्ठाता डॉ. माया इंदूरकर म्हणाल्या, ३ कोटींची यंत्रसामग्री मिळविण्यासाठी हापकीनकडे पाठपुरावा केला जात आहे. गरज असलेल्या यंत्रांची खरेदीच झालेली नाही. ‘डीसीआय’च्या नियमावलीनुसार ही यंत्रसामग्री आवश्यक आहे.

Web Title: 3 crore machinery of government dental college stuck