१०३ जागांसाठी २८९५ उमेदवार

By Admin | Updated: June 3, 2014 00:29 IST2014-06-02T23:49:39+5:302014-06-03T00:29:03+5:30

हिंगोली : येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १२ च्या अस्थापनेवरील रिक्त असलेल्या पोलिस शिपायांच्या १०३ पदांसाठी २ हजार ८९५ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

28,95 candidates for 103 seats | १०३ जागांसाठी २८९५ उमेदवार

१०३ जागांसाठी २८९५ उमेदवार

हिंगोली : येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १२ च्या अस्थापनेवरील रिक्त असलेल्या पोलिस शिपायांच्या १०३ पदांसाठी २ हजार ८९५ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या भरतीप्रक्रियेला ३ जूनपासून सुरूवात होणार असून सोमवारी दुपारी अधिकार्‍यांनी भरतीची रंगीत तालीम घेतली. राज्य राखीव पोलिस बल गटाचे प्रभारी समादेशक जे. एल. फुफाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्‍यांची रंगीत तालीम घेण्यात आली. पोलिस निरीक्षक एस. आर. काळवाघे, आर. के. बहाळे, डी. एन. पारडकर, बी. ए. शेख, फौजदार डी. एम. मोरे, के. पी. यरमुरे, टी. आर. तेली, एम. एम. अडलिंग, एस. एच. शेख यांच्यासह कर्मचारी हजर होते. एसआरपीएफच्या पोलिस शिपाई भरती प्रक्रियेसाठी ९ अधिकारी, १२ कार्यालयीन कर्मचारी १२० पोलिस कर्मचारी नेमण्यात आले आहेत. एसआरपीएफच्या मैदानावर ३ जून रोजी सकाळी ६ वाजता कागदपत्र पडताळणी, उंची व छातीचे मोजमाप घेण्यासाठी २ हजार ८९५ पैकी ६०० उमेदवारांना बोलावण्यात आले असल्याची माहिती पोनि काळवाघे यांनी दिली. ७ जूनपर्यंत ही पडताळणी व मोजमाप पूर्ण झाल्यानंतर ८ जून पासून उमेदवारांची शारिरीक चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेवून ही प्रक्रिया १५ जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. एसआरपीएफमधील ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार असून उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, व कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन प्रभारी समादेशक फुफाटे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)राज्य राखीव पोलिस बल गटाचे प्रभारी समादेशक जे. एल. फुफाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्‍यांची रंगीत तालीम घेण्यात आली. एसआरपीएफच्या पोलिस शिपाई भरती प्रक्रियेसाठी ९ अधिकारी, १२ कार्यालयीन कर्मचारी १२० पोलिस कर्मचारी नेमण्यात आले असून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. एसआरपीएफच्या मैदानावर ३ जून रोजी सकाळी ६ वाजता कागदपत्र पडताळणी, उंची व छातीचे मोजमाप घेण्यासाठी २ हजार ८९५ पैकी ६०० उमेदवारांना बोलावण्यात आले. ७ जूनपर्यंत ही पडताळणी व मोजमाप पुर्ण झाल्यानंतर ८ जून पासून उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे.

Web Title: 28,95 candidates for 103 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.