१०-१० २०२० ला जन्मली २८ बालके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 13:03 IST2020-10-11T13:02:19+5:302020-10-11T13:03:32+5:30
१०- १०- २०२० या युनिक तारखेला विवाह करू इच्छिणाऱ्या अनेकांचा विवाह मुहूर्त नसल्यामुळे आणि विवाह नोंदणी कार्यालये बंद असल्याने हिरमोड झाला. परंतु शहरातील २८ बालकांनी मात्र ही तारीख बरोबर गाठली आणि १०- १०- २०२० या तारखेला जन्म घेतला.

१०-१० २०२० ला जन्मली २८ बालके
औरंगाबाद : १०- १०- २०२० या युनिक तारखेला विवाह करू इच्छिणाऱ्या अनेकांचा विवाह मुहूर्त नसल्यामुळे आणि विवाह नोंदणी कार्यालये बंद असल्याने हिरमोड झाला. परंतु शहरातील २८ बालकांनी मात्र ही तारीख बरोबर गाठली आणि १०- १०- २०२० या तारखेला जन्म घेतला.
घाटी रूग्णालयात या युनिक तारखेला १८ मुले आणि १० मुलींनी जन्म घेतला. विशेष काही प्लॅनिंग केले नाही, तरी आपले अपत्य या अनोख्या तारखेला जन्मले आहे, याचा अतिशय आनंद झाला, असे पालकांनी सांगितले.
अंकशास्त्रानुसारही ६ हा अंक शुभ मानला जातो. त्यामुळे १०- १०- २०२० या तारखेची बेरीजही ६ येत असल्याने ही तारीख शुभ असल्याचे अंकशास्त्रज्ञांनी सांगितले.