राज्य गदायुद्ध स्पर्धेत २७९ खेळाडूंचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:49 IST2017-12-26T00:49:31+5:302017-12-26T00:49:47+5:30
सेंट मीरा हायस्कूल प्रशालेत सोमवारपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय गदा स्पर्धेत महाराष्ट्रभरातून २७९ खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

राज्य गदायुद्ध स्पर्धेत २७९ खेळाडूंचा सहभाग
औरंगाबाद : सेंट मीरा हायस्कूल प्रशालेत सोमवारपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय गदा स्पर्धेत महाराष्ट्रभरातून २७९ खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे उद्घाटन महापौर नंदकुमार घोडेले यांनी केले. याप्रसंगी औरंगाबाद जिल्हा गदायुद्ध स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, भीमराव शेरे, महाराष्ट्र गदायुद्ध स्पोर्टस् असोसिएशनचे उपाध्यक्ष केदार रहाणे, सचिव मच्छिंद्र राठोड, सुधाकर गायकवाड, मनीष पाटील, अर्जुन भूमकर, विकास ठोकळ आदी उपस्थित होते. याप्रसंगी महापौर चषक गदायुद्ध स्पर्धा आयोजित करणार असल्याची घोषणा महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली.