मीटर तपासणीसाठी २७० पथके दारोदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:05 IST2017-10-25T01:05:32+5:302017-10-25T01:05:46+5:30

आता २७० पथकांच्या माध्यमातून शहरातील ‘ई’ ते ‘जी’ फिडरवरील ग्राहकांचे मीटर व वीज वापराची तपासणी काल मंगळवारपासून केली जात आहे

 270 squad for the meter inspection | मीटर तपासणीसाठी २७० पथके दारोदारी

मीटर तपासणीसाठी २७० पथके दारोदारी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांतील वीज चोºया पकडल्यानंतरही गळतीचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे आता २७० पथकांच्या माध्यमातून शहरातील ‘ई’ ते ‘जी’ फिडरवरील ग्राहकांचे मीटर व वीज वापराची तपासणी काल मंगळवारपासून केली जात आहे. या तपासणीच्या माध्यमातून कोणत्या घरामध्ये वीजचोरी होते, कोण थकबाकीदार आहे, याचा अंदाज येईल व अशा ग्राहकांविरुद्ध कारवाई करणे सोपे जाईल, असे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले की, २७० पथकांमध्ये औरंगाबाद शहरातील ३५०, ग्रामीणमधील १४० आणि जालन्याचे १४५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दहा पथकांवर एक कनिष्ठ अभियंता किंवा सहायक अभियंत्याचे नियंत्रण असेल. प्रत्येक पथकामध्ये ३ ते ४ कर्मचा-यांचा समावेश राहील.

Web Title:  270 squad for the meter inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.