शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

लोकसभा निवडणुकीची २६ फेऱ्यांत होणार मतमोजणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:09 PM

औरंगाबाद : लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेल्ट्रॉन कंपनी (सिपेट) येथील इमारतीमध्ये होणार आहे. ...

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण : बुधवारी होणार कर्मचाºयांची रंगीत तालीम

औरंगाबाद : लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेल्ट्रॉन कंपनी (सिपेट) येथील इमारतीमध्ये होणार आहे. सकाळी ७ वाजता उमेदवार, तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षित कक्ष (स्ट्राँग रूम) उघडला जाईल. प्रत्यक्ष मतमोजणीला ८ वाजता सुरुवात होणार असून, प्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार आहे. ८.३० वाजता सर्व ईव्हीएम मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून, एकूण २६ फेºयांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी आयोगाने दोन निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली असून, विधानसभा मतदारसंघ क्रमांक १०५, १०७, १०८ या मतदारसंघांसाठी ब्रजमोहन कुमार यांची, तर विधानसभा मतदारसंघ क्रमांक १०९, १११, ११२ या मतदारसंघांसाठी देवेंद्र सिंग यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मतमोजणी प्रक्रियेत १३० मतमोजणी सहायक, १३७ मतमोजणी पर्यवेक्षक, १३२ सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी १४ याप्रमाणे ६ मतदारसंघांसाठी ८४ टेबलवर २६ फेºयांमध्ये मतमोजणी प्रक्रिया करण्यात येणार आहे. ईव्हीएमच्या मतमोजणीनंतर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार व्हीव्हीपॅटमधील मतपत्रिकांची मोजणी करण्यात येणार आहे.यावर्षी ४,७७५ टपाली मतपत्रिका निर्गमित करण्यात आल्या असून, आतापर्यंत २,११२ टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये ९९२ सैनिकांच्या मतपत्रिका असून, उर्वरित मतदान अधिकारी आणि कर्मचाºयांच्या मतपत्रिकांचा समावेश आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांच्या आधिपत्याखाली सुमारे ३०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.विधानसभा क्षेत्रनिहाय अशा होणार फेºयाऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्रे आहेत. मतदारसंघ क्रमांकनिहाय फेºया खालीलप्रमाणे होतील, (कंसात फेºयांची संख्या) आहे. कन्नड क्र. १०५ (२६ फेºया), औरंगाबाद मध्य क्र. १०७ (२४ फेºया), औरंगाबाद पश्चिम क्र. १०८ (२५ फेºया), औरंगाबाद पूर्व क्र. १०९ (२३ फेºया), गंगापूर क्र. १११ (२३ फेºया), वैजापूर क्र. ११२ (२५ फेºया) याप्रमाणे मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.२०२१ कंट्रोल युनिट हाताळणार२३ एप्रिल रोजी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील २,०२१ मतदान केंद्रांवर मतदान झाले. १८ लाख ८६ हजार २९४ मतदारांपैकी ११ लाख ९५ हजार २४२ मतदारांनी मतदान केले. मतदान प्रक्रि येसाठी २,०२१ नियंत्रण यंत्र संच (कंट्रोल युनिट) मतदानासाठी वापरण्यात आले. मतदान यंत्रावर कळ दाबल्यानंतर ज्या यंत्रात मतदाराने दिलेले मत नोंदविले गेले, ते कंट्रोल युनिटमध्ये संकलित होते. २३ उमेदवार आणि नोटा (आभासी उमेदवार) मिळून २४ उमेदवारांसाठी कंट्रोल युनिटमधील मतदान मोजले जाईल.मतदारसंघ झालेले मतदान आकड्यातकन्नड ६४.८० टक्के २ लाख २ हजार २३औरंगाबाद मध्य ६२.१९ टक्के १ लाख ९८ हजार ७८५औरंगाबाद पश्चिम ६२.७८ टक्के २ लाख ७ हजार ८२९औरंगाबाद पूर्व ६२.८० टक्के १ लाख ९२ हजार १९९गंगापूर ६५.८९ टक्के २ लाख ३ हजार ६२४वैजापूर ६२.०७ टक्के १ लाख ९० हजार ७८२एकूण ६३.४१ टक्के ११ लाख ९५ हजार २४२

टॅग्स :AurangabadऔरंगाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९