शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
2
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
3
वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
4
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
5
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
6
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
7
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
8
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
9
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
10
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
11
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
12
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
13
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
14
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
15
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
16
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
17
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
18
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
19
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!

मराठवाड्यात २६ टक्के उपयुक्त जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 12:21 AM

मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा गांजण्याची शक्यता आहे. विभागातील चार जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे सुमारे ३० ते ४० तालुक्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून मोठ्या, मध्यम व लघु, अशा ८६७ प्रकल्पांत २६.९० टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

ठळक मुद्देउन्हाळा गांजणार : ३१६ टँकरने पाणीपुरवठा, ५९५ विहिरींचे अधिग्रहण

औरंगाबाद : मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा गांजण्याची शक्यता आहे. विभागातील चार जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे सुमारे ३० ते ४० तालुक्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून मोठ्या, मध्यम व लघु, अशा ८६७ प्रकल्पांत २६.९० टक्के उपयुक्त जलसाठा आहे. ३१६ पर्यंत टँकरचा आकडा गेला असून, ५९५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. २५५ गावांमध्ये पाणीटंचाई आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात २५५ गावांत २१६ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, प्रशासनाने ५९५ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. जिल्हानिहाय टंचाई आराखड्याचे आदेश विभागीय पातळीवरून देण्यात आले आहेत. टंचाई आराखडा लवकरच अंतिम होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. १९० गावांत २३१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

यंदा शेती व इतर उपयोगासाठी जायकवाडीतून ८ आवर्तने देणे सध्या शक्य आहे. तिसऱ्या आवर्तनाचा अंतिम टप्पा संपत आला आहे. बंधाºयांची दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना विभागीय प्रशासनाने केल्या आहेत. विभागातील औरंगाबाद, नांदेड, लातूर, परभणी या जिल्ह्यांमध्ये गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस झाला. त्यामुळे या उन्हाळ्यात विभागातील सुमारे ३० ते ४० तालुक्यांत पाणीटंचाईची शक्यता निर्माण होऊ शकते. टंचाई आराखड्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाला प्रशासकीय पातळीवरून सूचना दिल्या आहेत.

८६७ प्रकल्पांत २६ टक्के पाणीविभागात ११ मोठे प्रकल्प आहेत. त्यामध्ये ३०.५५ टक्केजलसाठा आहे. ७५ मध्यम प्रकल्प असून, त्यामध्ये २६.२९ टक्के, ७४६ लघु प्रकल्पांत १५.६२ टक्के, तर ३५ बंधाºयांमध्ये ४४ टक्के जलसाठा आहे. एकूण ८६७ प्रकल्पांत २६.९० टके जलसाठा आहे. मोठ्या प्रकल्पांतील ४ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यातील तीन प्रकल्प नांदेड, तर १ प्रकल्प परभणी जिल्ह्यातील आहे. औरंगाबादमधील जायकवाडीत ७५ टक्के पाणी आहे. २५ ते ५० टक्क्यांदरम्यान पाणीसाठा हिंगोलीतील एका प्रकल्पात आहे. उस्मानाबादमधील दोन आणि परभणीतील एका मोठ्या प्रकल्पात ५० ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. बीडमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.

टँकरची सद्य:स्थिती अशीजिल्हा गावे टँकरऔरंगाबाद १९० २३१जालना ३५ ४४परभणी ०७ ०९हिंगोली ०२ ०२नांदेड २१ ३०बीड ०० ००लातूर ०० ००उस्मानाबाद ०० ००एकूण २५५ ३१६

टॅग्स :water shortageपाणीकपातMarathwadaमराठवाडाwater scarcityपाणी टंचाई