रस्ते दुरुस्तीला २५ कोटी ३३ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:11 IST2021-02-05T04:11:16+5:302021-02-05T04:11:16+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी २५ कोटी ३३ लाख रुपये आणि तीर्थक्षेत्र विकासासाठी ३ कोटी १७ लाख रुपये ...

रस्ते दुरुस्तीला २५ कोटी ३३ लाखांचा निधी
औरंगाबाद : जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी २५ कोटी ३३ लाख रुपये आणि तीर्थक्षेत्र विकासासाठी ३ कोटी १७ लाख रुपये असे एकूण २८ कोटी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती लवकरच होईल, अशी अपेक्षा आहे.
जिल्हा परिषद बांधकाम समितीची बैठक मंगळवारी सभापती किशोर बलांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीमध्ये ३०:५४ व ५०:५४ या लेखाशीर्षांतर्गत १६ कोटी ७८ लाख व ८ कोटी ५५ लाखांची, तर तीर्थक्षेत्र विकासासाठी ३ कोटी १७ लाख रुपयांंची तरतूद करण्याचे निश्चित करण्यात आले. ग्रामीण भागामधील अनेक रस्ते खराब झालेले आहेत. त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद सदस्यांनी रस्ते दुरुस्तीचे प्रस्तावही दिलेले आहेत. दरम्यान, ३०:५४ अंतर्गत १६ कोटी ७८ लाख रुपये, ५०:२४ अंतर्गत ८ कोटी ५५ लाख रुपये आणि ‘क’ दर्जाच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी ३ कोटी १७ लाख रुपयांची तरतूद आहे. दरम्यान बांधकाम समितीच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम वाटप होणार आहे. याचे नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान, बांधकाम विभागाकडे असलेल्या निधीतून ग्रामीण भागातील कामे आता विनाविलंब केले जातील, असे सभापती गलांडे यांनी सांगितले.