२५ बासरीवादकांची एकाच मंचावर जमली मैफल

By Admin | Updated: June 23, 2014 00:31 IST2014-06-23T00:08:55+5:302014-06-23T00:31:46+5:30

औरंगाबाद : एक मंच, एक कार्यक्रम आणि एकाच वेळी २५ बासरीवादक, अशी मनोहारी व आनंददायी मैफल संगीत रसिकांना अनुभवास मिळाली.

25 concert collectors on 25 th flute | २५ बासरीवादकांची एकाच मंचावर जमली मैफल

२५ बासरीवादकांची एकाच मंचावर जमली मैफल

औरंगाबाद : एक मंच, एक कार्यक्रम आणि एकाच वेळी २५ बासरीवादक, अशी मनोहारी व आनंददायी मैफल संगीत रसिकांना अनुभवास मिळाली. स्फूर्ती महिला मंचने बुधवारी आयोजित शास्त्रीय संगीताच्या बासरीवादन कार्यक्रमात संकल्पना म्युझिक क्लासेसच्या २५ विद्यार्थ्यांनी एकाच वेळी उत्कृष्टरीत्या बासरीवादन केले. यात १४ वर्षांवरील मुला-मुलींचा सहभाग होता.
हा कार्यक्रम सादरकर्ते गिरीश काळे म्हणाले की, बासरीवादनाचे अनेक कार्यक्रम होत असतात; परंतु त्यांचा प्रसार कमी असतो. बासरी या पारंपरिक वाद्याचा प्रसार व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. भारतीय शास्त्रीय संगीतात बासरीवादनाला मानाचे स्थान आहे.
पं. राकेश चौरसिया यांनी पाश्चात्त्य वाद्यांबरोबरच भारतीय बासरीवादनाचे कार्यक्रम करून जागतिक संगीताच्या व्यासपीठावर बासरीला नेवून ठेवले आहे. एका व्यासपीठावर बासरीवादन, सुगम गायन, हिंदी, मराठी भावगीते तसेच फ्युजन गीते सादर होत असतात, असे काळे म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात भूप रागाने करण्यात आली. नंतर कल्याण रागातून निर्माण झालेला यमन राग तसेच भावगीत, भक्तिगीत सादर झालेला राग दुर्गा सादर करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या समूहाने ‘सारंग रागाबरोबरच ओम जय जगदीश हरे...’ ही गत सादर केली. (गायली जाते ती चिज आणि वाजवली जाते ती गत) त्यानंतर ‘एक प्यार का नगमा है’, ‘पंख होते तो उड़ आती है’, ‘प्रेमानंद माऊली (भावगीत), लोकप्रिय बालगीत ‘लकड़ी की काठी’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’, ‘वंदे मातरम्’, ‘जयोस्तुते’ या गाण्यांच्या गत सादर करण्यात आल्या. त्यांना उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. गिरीश काळे यांना तबल्यावर अमेय बाभूळगावकर, जगदीश लोहार, पखवाजवादक विनय संकपाळ यांनी साथ दिली.
स्फूर्ती महिला मंचच्या अध्यक्ष अनुराधा सुभेदार, दमयंती मुळे, विमल तळेगावकर, मीना देशपांडे, नीला रानडे, सुवर्णलता शर्मा, ज्योत्स्ना राऊत, सुखदा नांदूरकर, शोभा प्रभुणे, पुष्पा कुलकर्णी, कालिंदी कोर्डे आदींची उपस्थिती होती. यावेळी महिला मंडळाच्या मे महिन्यात वाढदिवस असलेल्या सदस्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Web Title: 25 concert collectors on 25 th flute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.