विद्यापीठात २४ विहिरींचे पुनर्भरण

By Admin | Updated: May 3, 2016 00:51 IST2016-05-03T00:51:51+5:302016-05-03T00:51:51+5:30

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महाराष्ट्र दिनी ‘जलयुक्त विद्यापीठ’ मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

24 wells recharge in the university | विद्यापीठात २४ विहिरींचे पुनर्भरण

विद्यापीठात २४ विहिरींचे पुनर्भरण


औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महाराष्ट्र दिनी ‘जलयुक्त विद्यापीठ’ मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठ परिसरातील २४ विहिरींचे पुनर्भरण करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. भूगर्भशास्त्रज्ञ प्रा. अशोक तेजनकर, कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे, अरुनिमा फाऊंडेशनचे प्रमुख रघुनंदन लाहोटी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे, कुलसचिव डॉ. मुरलीधर लोखंडे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन, परीक्षा नियंत्रक डॉ. डी. एम. नेटके व विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे, कार्यकारी अभियंता रवींद्र काळे यांचीही उपस्थिती होती.
‘पाण्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन’ या विषयावर प्रा. तेजनकर यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, गेल्या वर्षी सरासरीहून थोडाच कमी पाऊस पडला तरी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली.
पाण्याचे पुनर्भरण या बाबतीत अद्यापही लोक जागरूक झालेले नाहीत. पाण्याचा प्रत्येक थेंब वाहून न जाऊ देता तो त्याच ठिकाणी मुरविला पाहिजे. ज्या जमिनीत पाणी मुरण्यास अडचणी येत असतील तेथे कृत्रिमरीत्या पाण्याचे पुनर्भरण झाले पाहिेजे.
पाणी संकल्प हेच मोठे समाजकार्य
प्रत्येकाने ‘पाणी संकल्प’ तयार करून राबविणे हे मोठे समाजकार्य आहे, असे यावेळी लाहोटी म्हणाले. रोहणवाडी परिसरात संस्थेच्या माध्यमातून १०० कोटी लिटर पाणी साठविले असेही ते म्हणाले. ‘जलयुक्त विद्यापीठ’ उपक्रम २०१६-१७ चे ब्रीद असून आम्ही ‘स्मार्ट व्हिलेज’ मध्ये या परिसराचे रूपांतर करणार आहोत, असे कुलगुरूचोपडे म्हणाले.
डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. संजय शिंदे यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
कार्यक्रमानंतर इतिहास वस्तुसंग्रहालयासमोर प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. यावेळी डॉ. किशन धाबे, डॉ. धर्मराज वीर, डॉ. अरुण खरात, डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. स्मिता अवचार, स्मिता चावरे, डॉ. धनंजय माने आदींची उपस्थिती होती.

Web Title: 24 wells recharge in the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.