शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
5
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
6
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
7
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
8
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
9
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
10
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
11
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
12
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
13
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
14
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
15
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
16
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
17
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजलेल्या २४ टक्के रुग्णांचा मृत्यू

By admin | Updated: July 22, 2014 00:10 IST

विलास चव्हाण, परभणी येथील जिल्हा रुग्णालयातील जळीत विभागात मार्च २०१३-१४ मध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांपैकी २४ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला़

विलास चव्हाण, परभणी
येथील जिल्हा रुग्णालयातील जळीत विभागात मार्च २०१३-१४ मध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांपैकी २४ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला़ तर ७६ टक्के रुग्णांचा प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले़
आई, वडिलांनी मुलांना अथवा पतीने पत्नीला रागावल्याने रागाच्या भरात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेणे तसेच पेटता देवा अंगावर पडणे तसेच स्टोव्हच्या भडक्यामुळे मार्च २०१३-१४ या वर्षभरात परभणी जिल्हा रुग्णालयात ३८१ जळीत रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते़ त्यापैकी उपचारादरम्यान ९४ रुग्णांचा मृत्यू झाला तर २८६ रुग्णांवर उपचार करून त्यांचा जीव वाचविण्यास डॉक्टरांना यश आले़
वर्षभरामध्ये ३८१ रुग्ण या ना त्या कारणाने भाजले होते़ रुग्णालयात हा एवढा मोठा आकडा पहायला तर मोठा आहेच शिवाय खाजगी रुग्णालयामध्ये भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत़ वर्षभरात हजाराच्या जवळपास हा आकडा असेल़ घरातील क्षुल्लक कारणामुळे अनेक जण स्वत:ला पेटवून घेण्याच्या घटना वाढत आहेत़ यासाठी शासनस्तरावरून जनजागृती करणे गरजेचे आहे़ मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे़ त्यामुळे अनमोल जीव क्षुल्लक कारणामुळे गमवावे लागत आहेत़ याचे सोयरसूतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे़
पैसे घेऊन केली जाते मलमपट्टी
येथील जिल्हा रुग्णालयातील जळीत विभागातील परिचारिकांनी जळीत रुग्णांची मलमपट्टी करणे गरजेचे असते़ परंतु, येथे शिपाईच मलमपट्टी करण्यासाठी २०० ते ३०० रुपये रुग्णांकडून घेतात़ यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भूर्दंड बसत आहे़ पैसे नाही दिले तर मलमपट्टी तुम्हीच करा असे उद्धटपणे बोलले जाते़ रुग्णांचे नातेवाईक नाईलाजास्तव पैसे देतात़ याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे़
जळीत वार्डामध्ये तज्ज्ञ डॉक्टर व परिचारिकांचा अभाव आहे़ अशा प्रतिकूल परिस्थितीतही रुग्णांवर उपचार केले जातात़ अनेकांचे जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे़ तसेच खाजगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांना रुग्णांच्या उपचारासाठी बोलावले असता, हे डॉक्टर उपचारासाठी येत नाहीत़ त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे़, असे डॉ़ प्रकाश डाके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले़
येथील जिल्हा रुग्णालयात जळीत विभागात खाटांची संख्या २० आहे़ हा वार्ड वातानुकूलित आहे़
येथील जळीत वार्डात अनेक महिन्यांपासून तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे़ त्यामुळे जळीत रुग्णांना योग्य प्रकारे उपचार करणे अवघड झाले आहे़ त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांमधून नाराजी व्यक्त होत आहे़ प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करणे गरजेचे आहे़
तालुका व ग्रामीण भागातील रुग्णालयात जळीत रुग्णांसाठी सुविधांचा अभाव आहे़ त्यामुळे काही रुग्ण उपचार मिळण्यापूर्वीच मृत्यू पावतात़ तज्ज्ञ डॉक्टर व सुविधा आवश्यक आहेत़
मार्च२४
एप्रिल२३
मे २१
जून१७
जुलै२५
आॅगस्ट२०
सप्टें१४
आॅक्टो१७
नोव्हें२९
डिसेंबर२३
जाने़ २५
फेब्रु़२१
मार्च२७