कौटुंबिक हिंसाचाराचे वर्षात २३० कॉल
By Admin | Updated: December 11, 2014 00:46 IST2014-12-11T00:13:46+5:302014-12-11T00:46:46+5:30
प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद Submit ‘हॅलो, महिला हेल्पलाईनचाच नंबर आहे का... येथे अत्याचारीत महिलांना मार्गदर्शन केले जाते का... अहो मॅडम, माझे नाव अनुराधा (नाव बदलले आहे).

कौटुंबिक हिंसाचाराचे वर्षात २३० कॉल
प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद
‘हॅलो, महिला हेल्पलाईनचाच नंबर आहे का... येथे अत्याचारीत महिलांना मार्गदर्शन केले जाते का... अहो मॅडम, माझे नाव अनुराधा (नाव बदलले आहे). मला माझा पती दारूच्या नशेत दररोज बेदम मारत असतो. संशय घेतो, माझ्या लेकरांनाही मारतो, सासू-सासरेही माझा मानसिक छळ करीत असतात, याला मी खूप वैतागले आहे. जीव देण्याचा विचार मनात आला होता, पण मुलांचे काय होणार, या विचाराने मी जीव दिला नाही. मी काय करू’ असे म्हणत ती महिला फोनवर बोलताबोलताच रडू लागते.’
असा कौटुंबिक हिंसाचार सहन करणारी अनुराधा एकटीच महिला नाही. अशा असंख्य अनुराधा आपल्या पोटच्या मुलांकडे पाहूनच कुटुंबातीलच व्यक्तींचा अत्याचार सहन करीत जगत आहेत. महिला हेल्पलाईनमध्ये मागील वर्षभरात २३० पीडित महिलांचे कॉल आले आहेत.
महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे झाले. कठोर शिक्षेची तरतूदही करण्यात आली; मात्र महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होण्यापेक्षा वाढतच आहेत. सुशिक्षित घराण्यातही अत्याचाराच्या घटना घडत असतात.