शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

शहरात २३ मजल्यांची इमारत उभारता येईल; १५० चौरस मीटरपर्यंत बांधकाम परवानगीची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 12:36 PM

३० मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यावर बेसिक चटईक्षेत्र निर्देशांक १.१० प्रीमियम एफएसआय ०.५० व टीडीआर १.४० अशा रीतीने ३.०० चटईक्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय होईल.

ठळक मुद्दे७० मीटर उंचीपर्यंत बांधकामास परवानगीझोपडपट्टी पुनर्वसनासाठी ४ इतका चटईक्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय

औरंगाबाद : राज्य शासनाने गोरगरीब नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्यातील बांधकाम नियमावलीत मोठे फेरबदल केले. औरंगाबाद शहरात भविष्यात ७० मीटर म्हणजेच २३ मजल्यांची इमारत उभी करता येईल. १५० चौरस फुटापर्यंतच्या बांधकामाला महापालिकेकडून परवानगी घेण्याची गरज राहणार नसल्याची माहिती राज्याचे नगररचना संचालक सुधाकर नांगनुरे यांनी सोमवारी औरंगाबादेत आयोजित कार्यशाळेत दिली.नगररचना विभागाने तयार केलेली एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली राज्य सरकारने ३ डिसेंबर २०२० पासून लागू केली आहे. या नियमावलीची सर्व सामान्य नागरिकांसह विभागातील अधिकारी, वास्तूविशारद, अभियंता यांना माहिती व्हावी या उद्देशाने क्रेडाई आणि मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी एमजीएममधील रुख्मिणी सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली.

यावेळी संचालक सुधाकर नांगनुरे यांनी नवीन विकास नियमावली कशा पद्धतीने राबविण्यात येणार आहे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थितांच्या शंकांचे समाधान त्यांच्याकडून करण्यात आले. १५० चौ.मी च्या वर ३०० चौ.मी. पर्यत भूखंडधारकांना केवळ दहा दिवसांत परवानगी देण्याची तरतूद नवीन नियमावलीत करण्यात आली आहे. ३० ते ५० चौ. मी. बांधकाम क्षेत्राच्या सदनिका बांधण्यात येत असतील तर रस्त्याच्या रुंदीनुसार अनुज्ञेय असणार बेसिक एफएसआय अधिक प्रीमियम एफएसआय अधिक टीडीआर हे एकत्रित पोटॅंशियल ५ टक्के प्रीमियम भरुन बेसिक एफएसआय म्हणून अनुज्ञेय होणार आहे. यामुळे सदनिका पुरवठ्यात वाढ होऊन मध्यमवर्गीयांसाठी स्वस्त दरात घरे उपलब्ध होणार आहेत. झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ४ इतका चटईक्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय करण्यात आला आहे.

७० मीटर उंचीपर्यंत बांधकामास परवानगीमुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक मनपा क्षेत्रात इमारतींच्या उंचीला मर्यादा राहणार नाही. मात्र इतर मनपा क्षेत्रासाठी ७० मीटर उंचीपर्यंत (२३ मजले) बांधकामास परवानगी देता येईल. नगरपालिका, नगरपंचायती, प्रादेशिक योजना क्षेत्रात ५० मीटर उंचीपर्यंत मर्यादा ठेवण्यात आली. यावेळी एमआयडीसीचे मुख्य नियोजनकार श्रीरंग लांडगे, सहसंचालक अविनाश पाटील, सुनील मरळे, सुलेखा वैजापूरकर, सुमेध खरवडकर यांच्यासह क्रेडाई संस्थेचे राजेंद्रसिंग जबिंदा, रवी वट्टमवार, प्रमोद खैरनार, सुनील बेदमुथा, नितीन बगडीया, विकास चौधरी, भास्कर चौधरी, संग्राम पठारे, आशुतोष नावंदर, अनिल मुनोत, देवानंद कोटगिरे, आखिल खन्ना आदींची उपस्थिती होती.

चटई निर्देशांकामध्ये वाढचटई निर्देशांकामध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. ३० मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यावर बेसिक चटईक्षेत्र निर्देशांक १.१० प्रीमियम एफएसआय ०.५० व टीडीआर १.४० अशा रीतीने ३.०० चटईक्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय होईल. या व्यतिरिक्त अ‍ॅन्सिलरी एरिया चटई क्षेत्र निर्देशांकाची तरतूद करण्यात आली असून, तो निवासी वापरासाठी ६० टक्के व बिगर रहिवास वापरासाठी ८० टक्के अनुज्ञेय करण्यात आला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका