शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

५३ पैकी २३ पदे रिक्त

By admin | Updated: December 20, 2014 23:36 IST

व्यंकटेश वैष्णव ल्ल बीड जिल्ह्यातील बहुतांश शासकीय कार्यालयांची वाटचाल प्रभारी अधिकाऱ्यांवरच सुरू आहे. यामुळे ग्रामीण भागातील आलेल्या माणसाचे काम होईलच याची शास्वती देता येत नाही

व्यंकटेश वैष्णव ल्ल बीडजिल्ह्यातील बहुतांश शासकीय कार्यालयांची वाटचाल प्रभारी अधिकाऱ्यांवरच सुरू आहे. यामुळे ग्रामीण भागातील आलेल्या माणसाचे काम होईलच याची शास्वती देता येत नाही. असे चित्र बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. अनेक शासकीय कार्यालयातील मुख्य पदच रिक्त आहेत. यापैकी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात मागील सात वर्षापासून पूर्णवेळ अधिक्षक नसल्याने कार्यालय वाऱ्यावर असून येथे ५३ पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ ३० जणांवरच कार्यालयाचा कारभार सुरू असून चक्क २३ पदे रिक्त आहेत.दारूबंदी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दारू दुकानांना अचानक भेटी देऊन त्यांच्याकडील परवान्यांची तपासणी करणे अपेक्षीत आहे. परंतू कार्यालयातील पथकाला वाहन नसल्यामुळे जिल्ह्यातील परमीट रूम, बियरबार, देशी दारू दुकान तपासणी करणे शक्य होत नसल्याचे सुत्रांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सातवर्षापूर्वीच बीड येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाला पूर्ण वेळ अधिक्षकांची नियुक्ती केलेली आहे. मात्र नियुक्ती दिलेल्या महिला अधिकारी येथील कार्यालयात रुजूच झालेल्या नाहीत. यामुळे लातूर अथवा औरंगाबाद विभागातील अधिकाऱ्याकडेच बीडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचा पदभार सोपविला जातो. यामुळे अवैध दारू विक्री करणाऱ्या दुकानांवर रोख लावण्यासाठी ठोस अशी कुठलीच कारवाई मागील चार ते पाच वर्षात झालेली नाही.४येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील पथकाला वाहन नसल्याच्या कारणावरून दारू दुकानांची तपासणी होऊन कारवाई होत नाही.४परंतु बियरबार, परमीट रूम यांना परवानग्या देण्याचे काम सुरूच आहे. ४सूत्रांनुसार, मागील तीन महिन्यात ४८ वेगवेगळ्या प्रकारच्या दारू दुकांनांना परवाने दिलेले आहेत़४बीड येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचा प्रभारी पदभार लातूर येथील अधीक्षक के. जी. राऊत यांच्याकडे आहे. ते आठवड्यातून तीनच दिवस बीडला येतात़४लातूर कार्यालयाचे कामकाज सांभाळून बीड येथील काम करावे लागत असल्याचे राऊत यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.