शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

३ मिनिटांत विक्रमी २११ अर्धबैठका; औरंगाबादच्या अप्पासाहेब गायकवाड यांचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 5:49 PM

पहिल्या १00 अर्धबैठका ८६ व दुसऱ्या १00 बैठका अवघ्या ८४ सेकंदांत पूर्ण केल्या

ठळक मुद्दे‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’साठी दावा 

औरंगाबाद : जिद्द, तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर अप्पासाहेब गायकवाड यांनी वयाच्या ४७ व्या वर्षी गुरुवारी अवघ्या तीन मिनिटांत २११ अर्धबैठका (स्क्वॉट) मारत नवीन विक्रमाला गवसणी घालत ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’साठी मजबूत दावा ठोकला आहे. याआधी इंग्लंडच्या आंद्रे तुरन याने तीन मिनिटांत २00 अर्धबैठका मारत ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद केली होती. हा विक्रम अप्पासाहेबने गुरुवारी मागे टाकला.

गुरुवारी एमएसएमच्या जिम्नॅस्टिक हॉलमध्ये सकाळी १0.४0 वाजता उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाटात पैठण तालुक्यातील अप्पासाहेब गायकवाड यांनी सुरुवात केली. अतिशय चैतन्यपूर्ण वातावरणात अप्पासाहेब गायकवाड यांनी पहिल्या १00 अर्धबैठका ८६ व दुसऱ्या १00 बैठका अवघ्या ८४ सेकंदांत पूर्ण केल्या आणि अखेरच्या ११ बैठका त्यांनी १0 सेकंदांत मारताना नवीन विक्रमाला गवसणी घातली. यावेळी मुख्य निरीक्षक म्हणून शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मकरंद जोशी, निरीक्षक म्हणून नितीन कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, वेळ अधिकारी म्हणून सुरेंद्र मोदी व विजय इंगळे यांनी काम पाहिले. पूर्णवाद स्पोर्टस अँड हेल्थ प्रमोशन अकॅडमीतर्फे आयोजित या उपक्रमास माजी आमदार संजय वाघचौरे, कोषाध्यक्ष संकर्षण जोशी, प्राचार्य डॉ. शत्रुंजय कोटे, डॉ. विशाल देशपांडे, सोमाजी बलुरे उपस्थित होते.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यादृष्टीने २0१२ पासून मी सराव करीत होतो. शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मकरंद जोशी यांना भेटल्यानंतर मला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. यासाठी गेल्या दीड महिन्यापासून मी कठोर सराव केला होता. त्यामुळेच तीन मिनिटात २११ अर्धबैठका आपण मारू शकलो.-अप्पासाहेब गायकवाड

उल्लेखनीय कामगिरी :२०१२ : एका मिनिटात ६७ दंडबैठका मारत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद.२०१४ : १ तास ४९ मिनिटात ४ हजार ४ दंडबैठका मारत युनिक वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद.२०१६ : ३ मिनिटांत २0६ दंडबैठका मारत असिस्ट वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादguinness book of world recordगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड