शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

२०८ स्त्रोतांचे पाणी दूषित

By admin | Updated: August 6, 2014 02:27 IST

उमानाबाद : सार्वजनिक स्त्रोताच्या पाण्याची अणूजीवविषयक तपासणी आॅगस्ट महिन्यात करण्यात आली आहे.

उमानाबाद : सार्वजनिक स्त्रोताच्या पाण्याची अणूजीवविषयक तपासणी आॅगस्ट महिन्यात करण्यात आली आहे. यामध्ये ११३४ पैकी २०८ स्त्रोतांचे पाणी दूषित असल्याचे आढळून आले असून, याचे प्रमाण जिल्ह्यात १८ टक्के आहे.जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेकडून दर महिन्याला जिल्ह्यातील सार्वजनिक स्त्रोतांचे पाणी नमुने घेऊन तपासणी करण्यात येते. आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यातील ११३४ नमुने तपासणीसाठी या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. यापैकी २०८ स्त्रोतांचे पाणी दूषित आढळून आले आहे. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील २६५ स्त्रोतांचे पाणी नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. यापैकी ६६ स्त्रोतांचे पाणी पिण्यास योग्य नाही. तसेच तुळजापूर तालुक्यातील १९९ पैकी १५, परंडा तालुक्यात ७७ पैकी १९, कळंब १२६ पैकी ३३, भूम १२२पैकी २५, लोहारा ९४ पैकी १०, वाशी ८३ पैकी २२ स्त्रोतांचे पाणी पिण्यास योग्य नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे कॉलरा, कावीळीसारख्या रोगांची उत्पती होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असा सल्ला मुख्य अणुजीव शास्त्र फेरोज पठाण यांनी दिला आहे. (वार्ताहर)१५६ गावात दूषित पाणीभूम तालुक्यातील अंभी प्राथमिक आरोग्य केंद्रातील ५ गावे, ईट ५, माणकेश्वर ४, पाथ्रूड ५, वालवड ५ गावात पाणी नमुने दूषित आढळले. कळंब तालुक्यातील दहिफळ २, ईटकूर ४, मंगरुळ क.६, मोहा ३, शिराढोण ४ तर येरमाळा ४ , लोहारा तालुक्यातील आष्टाकासार १, जेवळी ४, कानेगाव २, माकणी १, उमरगा तालुक्यातील आलूर प्राथमिक आरोग्यकेंद्रातील ६ गावे, मुळज ५, नाईचाकूर ५, येणेगूृर ३, उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी १२, जागजी ८, केशेगाव ४, कोंड १, पाटोदा २, पोहनेर ४, समुद्रवाणी २, येडशी ५, परंडा तालुक्यातील ५, अनाळा ४, जवळा नि ६, शेळगाव ४, तुळजापूर तालुक्यातील अणदूर ३, जळकोट १, काटगाव ३, मंगरुळ तु ३, नळदुर्ग १, सावरगाव ५ तर वाशी तालुक्यातील पारा ६ , पारगाव ७ असे जिल्ह्यातील ६३ प्राथमिक आरोग्य केंद्रातील १५६ गावात दुषित पाणी नमुने आढळले असल्याचे जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेच्या वतीने सांगण्यात आले.