औरंगाबादसाठी २०१४ भाग्यदायी
By Admin | Updated: June 2, 2014 01:34 IST2014-06-02T01:29:35+5:302014-06-02T01:34:56+5:30
औरंगाबाद : शहरासाठी २०१४ हे साल भाग्यदायी ठरू लागले आहे. शहरात एक- दोन नव्हे तर तब्बल दीड हजार कोटींच्या विकासकामांची मुहूर्तमेढ रोवली जात आहे.

औरंगाबादसाठी २०१४ भाग्यदायी
औरंगाबाद : शहरासाठी २०१४ हे साल भाग्यदायी ठरू लागले आहे. शहरात एक- दोन नव्हे तर तब्बल दीड हजार कोटींच्या विकासकामांची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. पायाभूत सेवा-सुविधांची ती कामे असून, पाणीपुरवठा, रस्त्यांच्या कामाचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. ही कामे आगामी काळात पूर्ण झाल्यास शहराच्या वाहतुकीचा आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. केंद्र शासन, राज्य शासन आणि महापालिकेची ती कामे आहेत. शासनाच्या दोन महत्त्वपूर्ण योजनेसह शहरातील रस्त्यांची, उड्डाणपुलांची कामे होत आहेत. समांतर जलवाहिनीच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. भूमिगत गटार योजनेच्या वर्कआॅर्डरचे कामही अंतिम टप्प्यात आहे. शहरात सार्वजनिक बांधकाम आणि मनपाच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. तसेच सिडको बसस्थानक चौक ते रामगिरी आणि अमरप्रीत ते मोंढानाका या उड्डाणपुलाचे कामही सुरू झाले आहे.