मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी २०० एसटी धावणार
By संतोष हिरेमठ | Updated: October 22, 2023 21:18 IST2023-10-22T21:18:34+5:302023-10-22T21:18:42+5:30
मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी जिल्ह्यातील सिल्लोड येथून सोमवारी दुपारी २०० एसटी भरून राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते जाणार आहे.

मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी २०० एसटी धावणार
छत्रपती संभाजीनगर : मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी जिल्ह्यातील सिल्लोड येथून सोमवारी दुपारी २०० एसटी भरून राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते जाणार आहे. जिल्ह्यातील ५३८ पैकी १५० आणि जालन्यातील ५० एसटी दोन दिवस मुंबईत राहणार आहे. प्रवाशांच्या सेवेत राहणाऱ्या बसगाड्याचे ऐन सणासुदीला ‘सीमोल्लंघन’ होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मेळाव्यासाठी मुंबईला नेण्याची तयारी करण्यात आली. मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी जिल्ह्यातील १५० आणि जालन्यातील ५० बसगाड्यांची बुकिंग करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठही आगारांतून या बसेस पाठविण्यात येणार आहे. कमी भारमान असलेल्या म्हणजे कमी प्रवासी असलेल्या बसगाड्यांच्या फेऱ्या स्थगीत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयाकडे प्रासंगिक करारावर या बसेस बुक करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी दिली.