केबीसीत २० कोटीची गुंतवणूक

By Admin | Updated: August 6, 2014 02:14 IST2014-08-06T00:50:06+5:302014-08-06T02:14:30+5:30

कुंभारपिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगावसह परिसरातील गुंज, लिंबोणी कोठाळा, कोकाटे हादगाव, अंतरवालीटेंभी, मंगरूळ, राजाटाकळी या गावातील

20 crores investment in KBC | केबीसीत २० कोटीची गुंतवणूक

केबीसीत २० कोटीची गुंतवणूक


कुंभारपिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगावसह परिसरातील गुंज, लिंबोणी कोठाळा, कोकाटे हादगाव, अंतरवालीटेंभी, मंगरूळ, राजाटाकळी या गावातील अनेक शेतकरी, कष्टकरी नागरिकांनी पैसे दुप्पट मिळण्याच्या आशेवर सुमारे २० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा अंदाज आहे. कंपनीने धोका दिल्याने परिसरातील असंख्य गुंतवणूकदार हबकून गेले आहेत.
गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र पैसे दुप्पटा होतील या मोहामायी अनेक शेतकऱ्यांना आपला पैसा या कंपनीत गुंतविला. अनेक महिलांनी दागदागिने विक्री करुन पैसे गुंतविले. परिसरातील ग्रामस्थांना तब्बल वीस कोटींना चुना लागला आहे. यामध्ये छोटे व्यापाऱ्यांचाही मोठा सहभाग आहे.
त्यामुळे अनेकांनी आपला छोटा व्यवसाय डबघाईला आल्याने व्यवसाय बंद करावा लागला. अनेकाकडे दुसऱ्याचे पैसे देणे असल्याने बऱ्याचदा नागरिकांचे किरकोळ वाद सुध्दा होत असल्याचे चित्र आहे. एका व्यापाऱ्याने लालसेपोटी १२ लाख रूपये गुंतविले आपले पैसे परत मिळणार नसल्याने त्याने अंथरुण धरले आहे. तर एका किराणा व्यापाऱ्याने त्यांच्या मित्रपरिवाला जवळून ३५ लाख रूपये भरले आहेत. परंतु पैसे मिळत नसल्याने व्यापाऱ्याच्या घरी सर्व मित्रपरिवार दररोज चकरा मारत आहे.
त्यामुळे त्यांचे शाब्दीक चकमक उडत आहे. झालेल्या प्रकाराबद्दल आम्हाला न्याय देण्याची मागणी सर्वच नागरिक करत आहेत. पोलिसांनी केबीसीच्या मुख्यसूत्रधाराला तात्काळ अटक करुन, गुंतवणूकदारांचे पैसे आदा करावेत अशी मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)

Web Title: 20 crores investment in KBC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.