शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

२ हजार ५०० ब्रास वाळूसाठा जप्त

By admin | Updated: July 5, 2014 00:43 IST

सेनगाव : तालुक्यातील रेती घाटावरून नियमबाह्यरित्या मोठ्या प्रमाणात वाळूउपसा होत

सेनगाव : तालुक्यातील रेती घाटावरून नियमबाह्यरित्या मोठ्या प्रमाणात वाळूउपसा होत असून या विरोधात मोठ्या तक्रारी वाढल्याने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने पूर्णा नदीवरील रेतीघाटाची तपासणी केली. या तपासणी दरम्यान वझर येथील रेतीघाटावर २ हजार ५०० ब्रास वाळूसाठा जप्त केला.तालुक्यातील पूर्णा नदीवरील बन, वझर या संयुक्त रेतीघाटावर नियमांचा बोजवारा उडविला जात असून यंत्राच्या सहाय्याने बेसुमार वाळूसाठा उपसा होत असल्याच्या तक्रारी परिसरातील ग्रामस्थांकडून होत असल्याने यासंबंधी ४ जुलैला जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्या सूचनेवरून उपविभागीय अधिकारी के. ए. तडवी, नायब तहसीलदार सारंग चव्हाण, मंडळ अधिकारी बोथीकर, घुगे आदींच्या पथकाने दोन्ही रेती स्थळाना अचानक भेट देवून पाहणी केली. या तपासणी दरम्यान वझर रेती घाटावरील २ हजार ५०० ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला असून इतर नियमांच्या वाळू दोन्ही रेती घाटावर तपासण्यात आल्या असल्याची माहिती सारंग चव्हाण यांनी दिली. (वार्ताहर)हिंगोलीत तीन टिप्पर पकडलेहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील रूपूर येथील नदीपात्रातून वाळूउपसा करून गौण खनिजाची अवैधरित्या वाहतूक करताना तीन टिप्पर पकडले आहेत. तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने सावरखेडा शिवारात ४ जुलै रोजी सकाळी १० वाजता ही कारवाई केली. गौण खनिजाची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार कडवकर यांनी मंडळ अधिकारी खंदारे, बेले, देवधरे, तलाठी बाबर यांच्यासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी सकाळी सावरखेडा शिवारात कारवाई केली. या कारवाईत तीन टिप्पर जप्त करून शहर पोलिस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले आहेत. तसेच वाहनासोबतच्या मजुरांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत दंडात्मक कारवाई अथवा गुन्हा दाखल झालेला नव्हता.