शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार
3
आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
4
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
5
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
6
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
7
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
8
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
9
व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
10
Crime: “तुझे दात चांगले नाहीत,निघून जा! नाही तर, मारून टाकीन” बायकोचा छळ, गुन्हा दाखल
11
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
12
डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
13
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
14
सनी देओलसोबत किसींग सीन, जुही शूटच्या दिवशीच गायब झालेली; निर्मात्यांनी सांगितला किस्सा
15
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
16
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
17
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
18
संसदेतील ग्रंथालय झाले आहे शोभेची वास्तू? ९० टक्क्यांहून अधिक खासदार वाचतच नाहीत!
19
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
20
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
Daily Top 2Weekly Top 5

भोकरदन तालुक्यात वाळूमाफियाकडून दोन तलाठ्यांचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:44 IST

वाळूमाफियांनी या आदेशाला ठेंगा दाखवत चक्क दोन तलाठ्यांचे अपहरण केल्याची घटना भोकरदन तालुक्यात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाईच्या पालकमंत्र्यांच्या आदेशाला २४ तास उलटत नाहीत. तोच वाळूमाफियांनी या आदेशाला ठेंगा दाखवत चक्क दोन तलाठ्यांचे अपहरण केल्याची घटना भोकरदन तालुक्यात घडली. या घटनेवरुन अवैध धंद्यांवर पोलिसांसह राज्य सरकारचा अंकुश राहिला नसल्याचे या घटनेवरुन दिसून येते. जप्त केलेले वाळूचे टिप्पर राजूर येथून तहसीलमध्ये घेऊन जाणाºया दोन तलाठ्यांचे वाळूमाफियाने अपहरण केले. तलाठ्यांना धावत्या वाहनातून ढकलून देण्याचाही प्रयत्न केला. रविवारी सकाळी आठच्या सुमारास बरंजळा ठोंबरे ते जवखेडा ठोंबरे दरम्यान पंधरा किलोमीटर हा थरार सुरू होता. पोलीस व महसूल पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने ट्रक अडवून तलाठ्यांची सुटका केली.तहसीलदार संगीता कोल्हे यांच्या पथकाने रविवारी सकाळी सातच्या सुमारास अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केली. यात राजूर चौफुलीवर त्यांनी एका टिप्परला (एमएच. २०, बीटी. १९२५ ) तीन ब्रास अवैध वाळूची वाहतूक करताना पकडले. तहसीलदारांच्या सूचनेवरून चालक संतोष शिंदेला घेऊन तलाठी भागवत जाधव व रामेश्वर कांबळे हे जप्त केलला टिप्पर घेऊन भोकरदन तहसीलकडे निघाले. अचानक एका जीपने टिप्परचा रस्ता अडवला व त्यामधून आलेल्या चालक सर्जेराव चव्हाण (रा. मानदेऊळगाव ता. बदनापूर ) याने दोन्ही तलाठ्यांना जिवे मारण्याची धमकी देत उतरण्यास सांगितले. तलाठी धमकीला न जुमानता टिपरमध्येच बसून राहिले. यामुळे संतापलेल्या त्या व्यक्तीने चालकाला खाली उतरवत टिपरचा ताबा घेतला. भरधाव टिप्पर बरंजळा रोडवर नेला.तहसीलदार संगीता कोल्हे यांचे पथक टिप्परचा पाठलाग करत होते. कोल्हे यांनी माहिती हसनबाद ठाण्याचे स. निरीक्षक किरण बिडवे यांना दिली. पथकाने टिप्परचा पंधरा किलोमीटर पाठलाग केला. भरधाव टिप्परने जवखेडा ठोंबरे या गावाजवळ एका दुचाकीस्वारास हूल दिली, पुढे एका मुलीला व बैलगाडीला उडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दोन्ही तलाठ्यांनी मोबाईलवरून तहसीलदार कोल्हे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता चालकाने त्यांना शिवीगाळ करत, मी टिपर खड्ड्यात घालून उडी मारेल, तुम्हाला, तहसीलदारांनाही जिवे मारेल अशी धमकी दिली. यासोबतच त्यांना टिपर मधून खाली ढकलण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघांनी प्रसंगावधान राखत जीव वाचवला. दरम्यान, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, बबनराव लोणीकर व अर्जुन खोतकर यांनी शनिवारीच कायदा सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक घेतली होती.