२ लाख मुलांची मूल्यमापन चाचणी
By Admin | Updated: April 4, 2016 00:24 IST2016-04-04T00:22:15+5:302016-04-04T00:24:12+5:30
हिंगोली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातंर्गत दुसरी संकलित मूल्यमापन चाचणी ५ व ६ एप्रिल रोजी घेण्यात येणार असून शिक्षण विभागाकडून तालुकास्तरावर प्रश्नपत्रिका वाटप करण्यात आल्या आहेत.

२ लाख मुलांची मूल्यमापन चाचणी
हिंगोली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातंर्गत दुसरी संकलित मूल्यमापन चाचणी ५ व ६ एप्रिल रोजी घेण्यात येणार असून शिक्षण विभागाकडून तालुकास्तरावर प्रश्नपत्रिका वाटप करण्यात आल्या आहेत. जवळपास २ लाख विद्यार्थ्यांची मूल्यमापन चाचणी घेतली जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व मान्यताप्राप्त शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा व गणित या विषयांच्या शैक्षणिक प्रगती चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम पायाभूत चाचणी राज्यस्तरावरून पश्नपत्रिका पुरवून १४ सप्टेंबर ते ७ आक्टोबर २०१५ या कालावधीत घेतली होती. भाषा विषयाची संकलित मूल्यमापन चाचणी (२) ही ५ तर गणिताची चाचणी ६ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. चाचणीमध्ये लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे, पायाभूत चाचणीप्रमाणे या चाचणीस जादा कालावधी दिला जाणार नाही. जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी तर तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी नियोजन करत केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांच्या वेळोवळी बैठका घेत त्यांना मूल्यमापन चाचणीविषयी मार्गदर्शन केल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
या चाचणीपूर्वी शिक्षकांनीही विद्यार्थ्यांची जोरदार तयारी करवून घेतली आहे. काही शाळांत मात्र ही तयारी नावालाच झाल्याने त्यांची गुणवत्ता पुन्हा एकदा उघडी पडणार असल्याचे चित्र आहे.