शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

उड्डाणपुलावर २ मित्रांना जीपने उडवले; एकाचा जागीच मृत्यू, एकजण ३० फूट खाली कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 13:16 IST

उड्डाणपुलावर दोन मित्रांना चारचाकीवाल्याने उडवले; एक जण हवेत उडून ३० फूट खाली कोसळला

छत्रपती संभाजीनगर : भरधाव स्काॅर्पिओने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकीवरील एक तरुण हवेत उडाला आणि उड्डाणपुलावरून थेट ३० फूट खाली रस्त्यावर कोसळला. या भीषण अपघातात दुचाकीस्वार दोन्ही तरुण ठार झाले. रेल्वे स्टेशन उड्डाणपुलावर ६ ऑक्टोबरला मध्यरात्री १:३० वाजता हा अपघात झाला. याप्रकरणी स्काॅर्पिओचालक आणि पाइपलाइनचे काम करणाऱ्या ठेकेदार जीव्हीपीआर कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत फिलीप पाखरे (रा. पीडब्ल्यूडी शासकीय निवासस्थान, पदमपुरा) आणि राहुल लखपतसिंग लोदी (रा. केशरसिंगपुरा, कोकणवाडी) अशी मृतांची नावे आहेत. ते दोघेही चांगले मित्र होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महानुभाव चौकाकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर जीव्हीपीआर कंपनीकडून पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनचे काम सुरू आहे. त्यासाठी कंपनीने कुठलीही पूर्वसूचना न देता, तसेच दिशादर्शक फलक न लावता त्या बाजूचा रस्ता बंद करून वाहतूक रॉंग साइडने वळविली होती. त्या रस्त्यावरून स्काॅर्पिओ (एमएच ०६, एएन ८०७६) रेल्वे स्टेशनकडे जात होती. त्याचवेळी दुचाकीस्वार ( एमएच २०, एफके ०४८२) हेमंत आणि राहुल हे दोघे मित्र महानुभाव चौकाकडे येत होते. राँग साइड जाणाऱ्या स्काॅर्पिओने उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली. 

ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकीवरील राहुल लोदी हा हवेत उंच फेकला गेला. तो उड्डाणपुलावरून थेट ३० फूट खाली रेल्वे पटरीच्या बाजूला रस्त्यावर कोसळला. त्याच्या छाती आणि पायाला गंभीर मार लागला. एवढ्या उंचीवरून कोसळेल्या राहुलचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुचाकीवरील दुसरा तरुण हेमंत जागीच ठार झाला. अपघात होताच स्कार्पिओ चालक गाडी सोडून पसार झाला आहे. दरम्यान, अपघात झाला तेव्हा राहुलचा चुलत भाऊ बॉबी लोदी हा मित्रासोबत चहा पिण्यासाठी जय टॉवर येथून सिल्कमिल कॉलनीकडे गेला होता. तेथून परतत असतानाच हा अपघात झाला. त्या दोघांनीच नातेवाइकांसह पोलिसांना घटनेची माहिती दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातDeathमृत्यू