१८,८१० शेतकऱ्यांनी भरला विमा
By Admin | Updated: August 3, 2014 01:14 IST2014-08-03T00:43:55+5:302014-08-03T01:14:57+5:30
भूम : सातत्याने दुष्काळी परिस्थिती येत असल्याने पिकाचे प्रचंड नुकसान होत असून, त्यात पुन्हा यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने तालुक्यात असणाऱ्या

१८,८१० शेतकऱ्यांनी भरला विमा
भूम : सातत्याने दुष्काळी परिस्थिती येत असल्याने पिकाचे प्रचंड नुकसान होत असून, त्यात पुन्हा यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने तालुक्यात असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण आठ शाखेत १८ हजार ८१० शेतकऱ्यांनी जवळपास १ कोटी ३७ लाख ३९ हजार १८६ रुपये पीक विमा भरला आहे. गतवर्षी पेक्षा जास्त पीक विमा भरण्यासाठी यंदा शेतकरी सरसावले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तालुक्यात गेल्या चार-पाच वर्षात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे शेती उद्योग अडचणीत आला आहे. त्यातच शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा केला असून, सोयाबीनची उगवण न झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. तालुक्यात ३० हजार ४०० हेक्टर खरिपाचे सरासरी क्षेत्र आहे. यंदा प्रत्यक्षात आतापर्यंत २७ हजार १०४ हेक्टरवर प्रत्यक्षात पेरणी जवळपास ८९.१६ टक्के इतकी झाली आहे. महिनाभरापासून पाऊस नसल्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. अशा परिस्थितीत पीक विमा भरला तर किमान पेरणीसाठी झालेला खर्च तरी मिळेल, या आशेने विमा शेतकरी विमा भरीत आहेत. (वार्ताहर)
भूम शाखा शाखेअंतर्गत २ हजार ५८७ शेतकऱ्यांनी १८ लाख ८८ हजार ४६५ रूपये, वालवड शाखेअंतर्गत २ हजार २२२ शेतकऱ्यांनी १७ लाख ६१ हजार २२५, ईट शाखेअंतर्गत २ हजार ४९९ शेतकऱ्यांनी २० लाख ७८ हजार ५५२, पाथरूड २ हजार ६८२ शेतकऱ्यांनी मिळून १९ लाख १५ हजार ३७ रूपये, गिरवली १ हजार ८४० जणांनी १३ लाख १५ हजार ४७३, माणकेश्वर १ हजार ३४५ जणांनी ११ लाख ३६ हजार ५७९, अंतगरगाव १ हजार ५२७ शेतकऱ्यांनी १० लाख १७ हजार २८८ आणि अंबी शाखेअंतर्गत १३ हजार २८८ शेतकऱ्यांनी मिळून २६ लाख २६ हजार २८५ जणांनी पीक विमा भरला आहे.