शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

कंटेनरच्या धडकेने १८ जखमी;८गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 10:39 IST

भरधाव कंटेनर ट्रकचे टायर फुटून झालेल्या विचित्र अपघातात १८ लोक जखमी झाले.

राजेंद्र बेलकर करमाड : भरधाव कंटेनर ट्रकचे टायर फुटून झालेल्या विचित्र अपघातात १८ लोक जखमी झाले. तर १ ट्रॅक्टर, २ अ‍ॅपे रिक्षा, २ छोटा हत्ती, २ मोटारसायकल अशा ७ वाहनांचा चुराडा झाला. औरंगाबाद-जालना रोडवर करमाड गावाजवळ कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास हा अपघात झाला. अपघात होताच कंटेनरचालक घटनास्थळाहून पसार झाला. जखमींपैकी ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना औरंगाबादमधील विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कंटेनर ट्रक (क्र. एम. एच.४३ वाय २२६५) हे अवजड यंत्रसामग्री घेऊन औरंगाबादकडून जालनाकडे जात होते. कंटेनरसमोर ट्रॅक्टर (क्र. एम. एच २० सी. टी. ९९०५) हे खत घेऊन चालले होते. अचानक कंटेनरचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला व कंटेनर ट्रॅक्टरवर जाऊन आदळले. भरधाव कंटेनरने ट्रॅक्टरला तसेच जवळपास शंभर फूट फरपटत नेले. रस्त्याच्या कडेला चिंचेच्या झाडावर दोन्हीही वाहने जाऊन अडकली. सोमवारी करमाडचा आठवडी बाजार होता. त्यामुळे कापूस खरेदी करणाऱ्या व्यापा-यांनी जालना मार्गावर दुकाने थाटली होती. तसेच चिंचेच्या झाडाखाली टरबूज व रसवंतीचे दुकान होते. या दुकानासमोर टोणगाव, आपतगाव, पिंप्रीराजा व लाडसावंगी येथील शेतकरी कापूस विक्रीसाठी आलेले होते, तर काही लोक टरबूज घेत होते. बेसावध असलेल्या या ग्रामस्थांवर अचानक कंटेनर व ट्रॅक्टर येऊन धडकले.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीFarmerशेतकरी