१७५ दारू दुकाने सीलबंद
By Admin | Updated: April 2, 2017 23:32 IST2017-04-02T23:29:40+5:302017-04-02T23:32:29+5:30
बीड : महामार्गापासून ५०० मीटरच्या आत असणाऱ्या हॉटेल, बीअर बार, देशी दारू दुकानांवर कारवाईचा बडगा राज्य उत्पादन शुल्क विभागाने उगारला आहे

१७५ दारू दुकाने सीलबंद
बीड : महामार्गापासून ५०० मीटरच्या आत असणाऱ्या हॉटेल, बीअर बार, देशी दारू दुकानांवर कारवाईचा बडगा राज्य उत्पादन शुल्क विभागाने उगारला आहे. शनिवारी पहिल्या दिवशी राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व राज्यमार्गावरील तब्बल ७० दारू विक्री दुकानांना सील ठोकण्यात आले आहे. रविवारपर्यंत १७५ दारू दुकाने बंद झाली आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने शनिवारी सकाळपासूनच कारवाई करण्यास सुरुवात झाली होती. पहिल्या दिवशी आष्टी, केज, परळी या तालुक्यांतर्गत येणाऱ्या दुकानांवर कारवाई झाली. याकरिता तालुकास्तरावरील अधिकाऱ्याशिवाय एक भरारी पथक नेमण्यात आले आहे. महामार्गापासून ५०० मीटरपेक्षा कमी अंतरावर जवळपास ४८९ दुकाने असून, त्यापेक्षा अधिक अंतरावर ३९ दुकाने आहेत.राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे उपनिरीक्षक ए.एम. मेडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)