१.७४ कोटी थेट बँकखात्यात जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2017 23:46 IST2017-06-13T23:45:46+5:302017-06-13T23:46:54+5:30

हिंगोली जिल्ह्यातील १0७५ विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली. राज्यातील ३३७३ विद्यार्थ्यांच्या खात्यावर १.७४ कोटी जमा झाले आहेत.

1.74 crore directly deposited in the bank account | १.७४ कोटी थेट बँकखात्यात जमा

१.७४ कोटी थेट बँकखात्यात जमा

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कळमनुरी येथील आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर गणवेश व इतर साहित्याचा निधी जमा झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील १0७५ विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली. राज्यातील ३३७३ विद्यार्थ्यांच्या खात्यावर १.७४ कोटी जमा झाले आहेत.
आता शासनाने साहित्य खरेदीसाठी निविदा प्रक्रिया करणे बंद केले आहे. त्यासाठी आता थेट लाभार्थ्यांचे आधार लिंक असलेले खातेक्रमांक घेवून त्यावर निधी जमा केला जात आहे. राज्यातील चार प्रकल्पांतर्गंत हा पथदर्शी प्रकल्प राबविला होता. त्यात पेन, राजूर, चिमूर व कळमनुरीचाही समावेश आहे. कळमनुरीअंतर्गत पिंपळदरी, बोथी, शिरड शहापूर, जामगव्हाण, गोटेवाडी या शासकीय आश्रमशाळांतील खाते क्रमांक दिलेल्या व आधार लिंकिंग असलेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर हा निधी जमा झाला आहे. इतरांचा निधी प्रकल्पाकडून त्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. १५ जून रोजी या शाळा सुरू होणार आहेत. त्यापूर्वी पालकांनी आपल्या पाल्याला आदिवासी प्रकल्प विभागाकडून दिलेल्या यादीतील सर्व साहित्य खरेदी करून द्यावयाचे आहे. यातील निधी इतर बाबींवर खर्च केल्यास कारवाईची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी हा निधी मुलांच्या साहित्यावरच खर्च करणे गरजेचे आहे.
राज्यातील प्रकल्पांना ७.७ कोटी
आदिवासी शासकीय आश्रमशाळेत १ ते ४ च्या विद्यार्थ्यांना ७५00 रुपये, ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांना ८५00 रुपये तर ८ ते १२ च्या विद्यार्थ्यांना ९५00 रुपये साहित्य खरेदीस दिले जातात. यात ३३७३ विद्यार्थ्यांच्या खात्यावर १.७४ कोटी जमा केले. तर ११ हजार ७६५ विद्यार्थ्यांचे ५.९५ कोटी प्रकल्पांकडे वर्ग केले आहेत.

Web Title: 1.74 crore directly deposited in the bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.