बीडमध्ये आढळले १७ डेंग्यूसदृश्य रुग्ण

By Admin | Updated: July 21, 2014 00:20 IST2014-07-20T23:51:44+5:302014-07-21T00:20:30+5:30

बीड: शहरात वाढती घाण व दूषित पाणी यामुळे नागरिकांसह बालकांचे देखील आरोग्य धोक्यात आले आहे.

17 dengue cases detected in Beed | बीडमध्ये आढळले १७ डेंग्यूसदृश्य रुग्ण

बीडमध्ये आढळले १७ डेंग्यूसदृश्य रुग्ण

बीड: शहरात वाढती घाण व दूषित पाणी यामुळे नागरिकांसह बालकांचे देखील आरोग्य धोक्यात आले आहे. शुक्रवारी बीड शहरातील एका खाजगी बाल रूग्णालयात १७ बालके डेंग्यू सदृश्य असल्याचे आढळून आले. याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळत आहे. डेंग्यू सदृश्य असलेल्या बालकांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. संजय जानवळे यांनी सांगितले.
गणेश रंगनाथ कोकाटे (वय ३, आमला ताग़ेवराई), आकाश रामहरी जाधव (वय ३ वर्षे नांदूर, ता़ केज),) साक्षी अंकुश मोरे(वय १४, संत नामदेवनगर, बीड), आदित्य माणिक पाथे (वय २ बाबूलाल तांडा, ता़पाथरी, जि़परभणी), मारिया असलम बागवान (वय ५, हिरालाल चौक, बीड), निखिल विजय राठोड (वय ५ नाळवंडी तांडा, ता़ बीड), पृथ्वीराज अशोक राठोड (वय २ नाळवंडी तांडा, ता़बीड), अभिजीत सुनील जाधव(वय ११ नांदूर ता़ केज), विकास बाबू चव्हाण(वय १५ कोळवाडी, ता़शिरूर), प्रतीक बिभीषण घायाळ (वय १२ शाहूनगर, बीड), वैष्णवी रवींद्र गर्जे(वय ११ महासांगवी ता़ पाटोदा), छोटू विवेक मुळे (वय ३ चिंचवटी) यांच्यासह इतर पाच रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस साथ रोगांची लागण होत चालल्याचे दिसून येत आहे़
मागील आठवडाभरापासून सुमारे २३ रूग्ण डेंग्यूसदृश्य आढळल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे़ यात आणखी वाढ होऊ शकते, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले़
साथरोगांच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे़ स्वच्छतेचा प्रश्न असो की, धूर फवारणी अथवा पाण्याची तपासणी करणे़; यासारखे उपक्रम राबविण्यात आरोग्य विभागाला जाग येत नसल्याचे दिसून येत आहे, आरोग्य विभागाने या साथरोगावर काही तरी उपाय योजना कराव्यात, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांसह सर्वसामान्य व्यक्तींमधून केली जात आहे़ यापैकी काही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे तर काही रुग्णांवर अद्यापही येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)
मागील आठ दिवसांपासून डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये होतेय वाढ
४ाांदूरघाटमध्ये आढळले होते एकाच दिवशी नऊ रुग्ण
डेंग्यूसदृश्य रुग्णांवर येथील खाजगी रुग्णालयात सुरु आहेत उपचार
आरोग्य विभागाचे होतेय दुर्लक्ष
धूर फवारणी, स्वच्छतेची होतेय मागणी
रुग्णांची प्रकृती स्थिर

Web Title: 17 dengue cases detected in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.