१५0 पोते गहू वसमतला पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:26 IST2017-08-25T00:26:00+5:302017-08-25T00:26:00+5:30
: वसमतहून हैदराबादकडे राशनचा गहू घेवून जाणारा ट्रक एलसीबीच्या पथकाने वसमतजवळ माळवटा शिवारात पकडला. यात गहू व ट्रक असा एकूण ६ लाख ३१ हजार ३७५ चा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

१५0 पोते गहू वसमतला पकडला
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : वसमतहून हैदराबादकडे राशनचा गहू घेवून जाणारा ट्रक एलसीबीच्या पथकाने वसमतजवळ माळवटा शिवारात पकडला. यात गहू व ट्रक असा एकूण ६ लाख ३१ हजार ३७५ चा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
राशनच्या काळ्या बाजाराचा सुरक्षित अड्डा वसमत तालुका झालाय. हे आता सप्रमाण सिद्ध होत आहे. वसमत तालुक्यात राशनचा काळा बाजार करणाºया टोळ्यांनी धुडगूस घातला आहे. कुरूंदा हे राशनच्या धान्याच्या तस्करीचे मराठवाड्यातील मुख्य केंद्र झाले आहे. परजिल्ह्यातूनही कुरूंदा येथे राशनचा गहू येतो व तेथून माळवटा गोदाममार्गे हैदराबादकडे रवाना होतो. मात्र कुरूंदा पोलिसांना हा राशनचा काळाबाजार दिसत नाही, हे विशेष. माळवटा येथे राशनच्या काळ्या बाजाराचा गोदाम आहे. तेथे ट्रक भरून येतात व रवाना होतात. तरीही ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांनी कधी छापा मारल्याचे ऐकावयास मिळत नाही. याच माळवटा परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने छापा मारून ट्रक क्र. एम. एच. २७ एक्स ३३०८ पकडला यात गव्हाचे १५० पोते आढळले. ट्रक हैदराबादकडे निघाला होता. चालकाने हा माल वसमतच्या एका व्यापाºयांच्या दुकानातून भरला असल्याचे पथकाला सांगितले. पथकाने त्या व्यापाºयास उचलले व चौकशी केली असता शहरात राशनचा गहू खरेदी करणाºया अनेक जणांकडून खरेदी करून हा माल हैदराबादकडे जात असल्याचे समोर आहे.