जिल्ह्यात पोहोचली १५ लाख पाठ्यपुस्तके
By Admin | Updated: June 7, 2014 00:54 IST2014-06-07T00:38:21+5:302014-06-07T00:54:25+5:30
औरंगाबाद : शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेद्वारे जिल्ह्यातील २ लाख ९ हजार ८५६ विद्यार्थ्यांच्या हाती शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके देण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने सोडला
जिल्ह्यात पोहोचली १५ लाख पाठ्यपुस्तके
औरंगाबाद : शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेद्वारे जिल्ह्यातील २ लाख ९ हजार ८५६ विद्यार्थ्यांच्या हाती शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके देण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने सोडला असून, शाळाशाळांमधून पुस्तके वितरित करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली.
जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिकेच्या शाळांसह खासगी अनुदानित शाळेतील पहिली ते आठव्या वर्गातील २ लाख ९ हजार ८५६ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी २० लाख १६ हजार ९१४ पुस्तकांची मागणी शिक्षण विभागाने नोंदविली होती. त्यानुसार आतापर्यंत १५ लाख १६ हजार ९१४ पाठ्यपुस्तकांच्या प्रती येथे दाखल झाल्या आहेत. पैठण, सिल्लोड, वैजापूर व औरंगाबाद तालुक्यांत व तेथून शाळांमध्ये ही पुस्तके वितरित करण्यात आली आहेत.
उर्वरित तालुक्यांना ही पुस्तके युद्धपातळीवर वितरित केली जाणार आहेत. यंदा तिसरी व चौथीचा अभ्यासक्रम बदलला असून, पुनर्रचित अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके अद्याप उपलब्ध झालेली नाहीत; परंतु ही पुस्तके लवकरच उपलब्ध होतील, असे उपशिक्षणाधिकारी एन. के. देशमुख यांनी सांगितले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी १०० टक्के पुस्तकांचे वितरण केले जाईल, असा दावाही उपासनी यांनी केला. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा - २२३८
खासगी अनुदानित
शाळा - ७४७
लाभधारक विद्यार्थी संख्या - २ लाख ९ हजार ८५६
आलेली पाठ्यपुस्तके - १५ लाख ५ हजार ४८
नोंदविलेली पुस्तकांची मागणी - २० लाख १६ हजार ९१४