शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १५ जिनिंग बंदच!

By admin | Updated: November 30, 2015 23:30 IST

जालना : जिल्ह्यात यंदा पडलेल्या अत्यल्प पावसामुळे शेतीचे उत्पादन चक्र पूर्णपणे कोलमडले आहे. शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कापसाने दगा दिल्याने

जालना : जिल्ह्यात यंदा पडलेल्या अत्यल्प पावसामुळे शेतीचे उत्पादन चक्र पूर्णपणे कोलमडले आहे. शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कापसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांसोबतच कापसावर अधारित उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील ३५ पैकी सुमारे १५ जिनिंग बंद असल्याचे चित्र आहे. यामुळे कोट्यवधीच्या उलाढालीवर परिणाम होणार आहे.जिल्ह्यात ३ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड होते. कापसाचे उत्पादनही बऱ्यापैकी होत होते. गत तीन ते चार वर्षांपासून या उत्पादनात ५० टक्क्यांनी घट आली आहे. याचा थेट परिणाम कापूस जिनिंग वर झाला आहे. ३५ पैकी १० ते १२ जिनिंग कसबशा सुरू झाल्या आहेत. गतवर्षी एक एकरास ३ क्विंटलचा उतारा झाला होता. साधारणपणे ९ लाख क्विंटलपेक्षा अधिक कापसाचा उतारा आला होता. यंदा हे प्रमाण दोन ते अडीच क्विंटलवर आल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.जिल्ह्यात गतवर्षी ९ लाख क्विंटल कापसाचे उत्पादन निघाले होते.आठ तालुक्यात मिळून ३५ जिनिंग आहेत.यातील काही जिनिंग कापसाअभावी तर काही जिनिंग इतर कारणामुळे बंद आहेत. यातून कापूस जिनिंग तसेच गाठींची निर्मिती होते. पूर्ण हंगाम जिनिंग व्यवस्थित चालल्यास १ लाख क्विंटल कापसाचे जिनिंग होते.मराठवाड्यात परिस्थिती बिकट असली तरी इतर ठिकाणी जिनिंग व्यवस्थित सुरू आहेत. मराठवाड्यातील बहुतांशी जिनिंंगची स्थिती नाजूक आहेत. (प्रतिनिधी)अनेक मजुरांना कापूस हंगाम सुरू झाला की, जिनिंग सुरू होईल, अशी अपेक्षा असती. ही अपेक्षा यंदा फोल ठरली आहे. एका जिनिंगमध्ये अंदाजे ५० मजूर काम करतात. जिनिंग बंदच असल्याने शेकडो मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. यात हेल्पर, फिटर, तंत्रज्ञ आदींचाही समावेश आहे.याविषयी जिनिंगचालक अनुप गुप्ता म्हणाले की, यावर्षी कापसाच्या उत्पादनात घट आली आली आहे. त्यामुळे बहुतांश जिनिंगवर परिणाम झाला आहे. काही चालकांनी कापसाला योग्य भाव देऊन जिनिंग सुरू केल्या आहेत. जिनिंग पूर्ण हंगाम चालतील अशी आशा नाही. कापसाचे दर परवडत नसल्याने काहींनी जिनिंग बंद ठेवल्या आहेत. जिनिंग व्यवसायातून होणारी आर्थिक उलाढाल मंदावली आहे. इतर राज्यात जिनिंग बऱ्यापैकी सुरू असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.