शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांत साडेतीन कोटी वसूल

By admin | Updated: December 18, 2014 00:38 IST

बीड : महावितरणच्या बीड विभागाला महिन्याकाठी १८ कोटींचे वसुलीचे उद्दिष्ट असताना केवळ ६ कोटीच रुपयांची वसुली होत असत़ त्यामुळे दिवसेंदिवस थकबाकीमध्ये वाढ होत होती़

बीड : महावितरणच्या बीड विभागाला महिन्याकाठी १८ कोटींचे वसुलीचे उद्दिष्ट असताना केवळ ६ कोटीच रुपयांची वसुली होत असत़ त्यामुळे दिवसेंदिवस थकबाकीमध्ये वाढ होत होती़ वसुलीविषयी आदेश मिळताच बीड विभागाने १५ दिवसातच साडेतीन कोटींची वसुली केली आहे़या वसुली मोहिमेला १ डिसेंबरपासून सुरूवात करण्यात आली आहे़ यामध्ये ५०० ते ५ हजार रूपयापर्यंत थकबाकी असणाऱ्या ग्राहकांचे थेट मीटर जप्त केले जात आहे़ बीड विभागात ३५ हजार ८८८ एवढ्या ग्राहकांची संख्या ५०० ते ५ हजार रूपयांदरम्यान आहे़ २ हजार ६३९ घरगुती ग्राहकांवर थेट कारवाई करण्यात आली आहे तर विभागात १८०४ ग्राहक हे व्यावसायिक स्वरूपाचे असून यामधील २८२ ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे़ बीड विभागाअंतर्गत असलेल्या शहर, ग्रामीण गेवराई, आष्टी, पाटोदा आदींचा समावेश होतो़ ही वसुली मोहीम अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे़ वाढती थकबाकी पाहता वसुलीची कडक पाऊले उचलण्यात आली आहेत़ १६ डिसेंबर रोजी उप कार्यकारी अभियंता एम़ एल़ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली १७ कर्मचाऱ्यांसह शहरातील संजीवनगर, व्यंकटेशनगर, भाग्यनगर, धानोरा रोड, नामदेव रोड आदी भागातील ३३ मीटर वीजबिल न भरल्यामुळे ताब्यात घेण्यात आले आहेत़ सरासरीइतकी वसुली होईपर्यंत ही मोहीम राबविणार असल्याचे उप कार्यकारी अभियंता एम़ एल़ जाधव यांनी सांगितले़ ग्राहकांनी त्यांची मानसिकता बदलून बिले अदा करण्याचे आवाहनही त्यांनी केले़ (प्रतिनिधी)