१५ अंध, अपंग शाळांची नोंदणी रद्द
By Admin | Updated: April 11, 2017 00:10 IST2017-04-11T00:06:53+5:302017-04-11T00:10:19+5:30
लातूर :अपंग कल्याण आयुक्तांनी जिल्ह्यातील १५ अंध, अपंग विद्यार्थ्यांच्या शाळांची नोंदणी रद्द केल्याचे आदेश सोमवारी दिले आहेत

१५ अंध, अपंग शाळांची नोंदणी रद्द
लातूर : विद्यार्थी संख्या कमी असणे, अपंग विद्यार्थ्यांना सुविधा न पुरविणे अशा त्रुटी आढळल्याने पुण्याच्या अपंग कल्याण आयुक्तांनी जिल्ह्यातील १५ अंध, अपंग विद्यार्थ्यांच्या शाळांची नोंदणी रद्द केल्याचे आदेश सोमवारी दिले आहेत. यात ७ अनुदानित तर ८ कायम विनाअनुदानित अपंग शाळांचा समावेश आहे.
जिल्ह्यात अंध, मूकबधीर, मतिमंद, अस्थिव्यंग विद्यार्थ्यांसाठी ७१ अनुदानित तर १६ विनाअनुदानित शाळा आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या आदेशानुसार गत आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील अंध, मूकबधीर, मतिमंद व अस्थिव्यंग शाळांची विशेष पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी असणे, स्वच्छतागृह व्यवस्थित नसणे, विद्यार्थ्यांना सुविधा न पुरविणे, तपासणीवेळी सहकार्य न करणे, तपासणी न करू देणे असे प्रकार घडले. त्याचा अहवाल पुण्याच्या अपंग कल्याण आयुक्तांकडे सादर करण्यात आला. दरम्यान, या शाळांच्या त्रुटी संदर्भात सूचना देऊन सुनावण्या घेण्यात आल्या. मात्र त्यात या शाळांनी (अधिक वृत्त हॅलो/२ वर)