१४९ जणांचा पत्ता कटला
By Admin | Updated: June 9, 2014 00:08 IST2014-06-08T23:35:48+5:302014-06-09T00:08:33+5:30
लातूर : जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेतील रिक्त ११३ पोलिस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे़

१४९ जणांचा पत्ता कटला
लातूर : जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेतील रिक्त ११३ पोलिस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे़ रविवारी बोलाविण्यात आलेल्या ४०० उमेदवारांपैकी ३२९ जण हजर झाले होते़ आतापर्यंत शारीरिक तपासणीसाठी हजर झालेल्या उमेदवारांपैकी १४९ उमेदवारांचा पत्ता या तपासणीतून कटला आहे़
बाभळगावच्या पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर ६ जूनपासून सरळसेवा पद्धतीने भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे़ ११३ पदांसाठी जवळपास साडेतीन हजारांवर अर्ज आल्याने दररोज ४०० उमेदवारांना शारीरिक तपासणी व कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्यात येत आहे़ ६ जून रोजी ४०० पैकी २९५ उमेदवार हजर राहिले होते़ त्यापैकी पडताळणीतून ३६ उमेदवार अपात्र ठरले़ ७ जून रोजी २०३ उमेदवार हजर तर १९७ उमेदवार गैरहजर होते़ हजर उमेदवारांपैकी ४८ उमेदवार अपात्र ठरले़ ८ जून रोजी हजर राहिलेल्या ३२१ उमेदवारांपैकी ६५ उमेदवार अपात्र ठरले आहेत़ तपासणी प्रक्रिया संपल्यानंतर सर्व पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी १८ जून रोजी पहाटे ५ वाजल्यापासून घेण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक बी़जी़ गायकर यांनी कळविले आहे़