जिल्ह्यात १.४८ मि.मी. पाऊस

By Admin | Updated: May 10, 2016 01:05 IST2016-05-10T00:51:08+5:302016-05-10T01:05:09+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात ९ मेच्या सकाळी ८ वाजेपर्यंत १.४८ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, शहरात सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास

1.48 mm in the district Rain | जिल्ह्यात १.४८ मि.मी. पाऊस

जिल्ह्यात १.४८ मि.मी. पाऊस


औरंगाबाद : जिल्ह्यात ९ मेच्या सकाळी ८ वाजेपर्यंत १.४८ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, शहरात सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली.
औरंगाबाद तालुक्यात ०.४० मि.मी.पावसाची नोंद झाली असून लाडसावंगी आणि हर्सूल मंडळ परिसरात पावसाची नोंद झाली आहे. पैठण तालुक्यातील ढोरकीन मंडळ हद्दीत ०.२० मि.मी. पाऊस झाला. कन्नड तालुक्यातील नाचनवेल आणि चिकलठाण मंडळ परिसरात ०.८८ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. वैजापूर, फुलंब्री, गंगापूर, खुलताबाद, सोयगाव, सिल्लोड या तालुक्यांत पाऊस झाला नाही. या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे आणि इतर हानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासकीय पातळीवर देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: 1.48 mm in the district Rain