शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

१४४ अर्जांची जिल्ह्यात झाली विक्री

By admin | Updated: September 20, 2014 23:39 IST

परभणी: विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना प्रकाशित झाली असून, अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात १४४ अर्जांची विक्री झाली़

परभणी: विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना प्रकाशित झाली असून, अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात १४४ अर्जांची विक्री झाली़ गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आ़ सीताराम घनदाट यांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला़ परभणी विधानसभा मतदार संघामध्ये ३६ जणांनी ८७ अर्ज खरेदी केले़ त्यात बारा जणांनी पक्षाच्या नावावर तर अपक्ष म्हणून २४ जणांनी अर्ज खरेदी केले आहेत़ बसपा, मजलीस बचाओ तहेरीक, वंचित समाज इन्साफ पार्टी, शिवसेना, काँग्रेस, भारिप- बहुजन महासंघ, राष्ट्रवादी काँग्रेस, एम़आय़एम़, रिपाइं (ए) आदी पक्षांच्या वतीने अर्ज खरेदी झाली आहे़ आज दिवसभरात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याचे निवडणूक विभागातून सांगण्यात आले़ घनदाट यांचा उमेदवारी अर्जगंगाखेड विधानसभा मतदार संघात ३३ उमेदवारी अर्ज विक्री झाले़ पहिल्याच दिवशी विद्यमान आ़ सीताराम घनदाट यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी एस़एच़ मावची यांच्याकडे दाखल केला़ यावेळी आ़ सीताराम घनदाट यांच्यासोबत सदाशिवअप्पा ढेले, गणेशराव काळे, भास्कर काळे, दत्तराव भोसले, जयसिंगअप्पा शिंदे, मधुकर चाटे, कैलास रुद्रवार, लाल खान पठाण, मधुसूदन लटपटे, गौतम रोहिणकर आदींची उपस्थिती होती़ जिंतुरातून २४ नामांकनाची विक्रीजिंतूर : सेलू विधानसभा मतदार संघातून २४ नामांकनांची चौदा जणांनी खरेदी केल़ी. यात मनसेचे खंडेराव आघाव, राकाँचे विजय भांबळे, सेनेचे संजय साडेगावकर, भाजपाचे विलास गिते, बसपाचे राहुल आमटे, सपाचे सय्यद दिलावर, शरिफ खान पठाण यांनी नामांकन खरेदी केले असून, यांच्या व्यतिरिक्त सात अपक्ष उमेदवारांनी नामांकन पत्र खरेदी केले आहेत़ उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी आज एकही नामांकन प्राप्त झाले नाही़ पाथरीत एकही अर्ज नाहीपाथरी विधानसभा मतदारसंघात २० सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज देणे-घेण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाने सुरू केली. परंतु, आज पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज विक्री झाला नाही. (प्रतिनिधी)