शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

13727 मतदार जिल्ह्यात वाढले

By admin | Updated: July 3, 2014 00:24 IST

हिंगोली : निवडणूक विभागाच्या वतीने जिल्ह्यात २१ ते २९ जून या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहीमेत जिल्ह्यात १३ हजार ७२७ नवीन मतदारांची नोंद झाली आहे.

हिंगोली : निवडणूक विभागाच्या वतीने जिल्ह्यात २१ ते २९ जून या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहीमेत जिल्ह्यात १३ हजार ७२७ नवीन मतदारांची नोंद झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाच्या वतीने छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ९ जूनपासून सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत ९ जून रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर या यादीवर ३० जूनपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या. याच दरम्यान २१ ते २९ जून या कालावधीत विशेष मतदार नोंदणी मोहीम जिल्ह्यात राबविण्यात आली.त्यानुसार वसमत विधानसभा मतदारसंघात ३ हजार ७४१, कळमनुरी विधानसभा मतदार संघात ३ हजार ७०७ आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघात ५ हजार ५७९ असे एकूण १३ हजार ७२७ मतदार वाढले. त्यानुसार आता वसमत विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ६२ हजार २५७ मतदान झाले असून, कळमनुरी विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ८० हजार ७६७ मतदारांची संख्या झाली आहे.हिंगोली विधानसभा मतदारसंघात २ लाख ८४ हजार ९९६ मतदारांची संख्या झाली आहे. जिल्ह्यात ३ विधानसभा मतदारसंघात आता एकूण ८ लाख २८ हजार २० मतदारांची नोंद झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करेपर्यंत नवीन मतदारांची नोंदणी चालूच राहणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)जिल्ह्यात आता ८ लाख २८ हजार मतदार२१ ते २९ जून या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहीमेत वसमत तालुक्यात ३ हजार ७४१, कळमनुरी तालुक्यात ४ हजार ४०७ तर हिंगोली तालुक्यात ५ हजार ५७९ मतदार वाढले.हिंगोली विधानसभा मतदारसंघात आता सर्वाधिक म्हणजे २ लाख ८४ हजार ९९६ मतदार.कळमनुरी विधानसभा मतदारसंघात आता एकूण २ लाख ८० हजार ७६७ मतदारांची नोंद.वसमत विधानसभा मतदारसंघात आता एकूण २ लाख ६२ हजार २५७ मतदारांची नोंद. नवमतदार नोंदणी चालूच राहणार.