शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टाग्रामवरील 'इमेज'ला भाळून १३ वर्षांची मुलगी गुजरातला पळाली; प्रत्यक्षात मुलगा ऑफिस बॉय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 12:47 IST

मुलाचे आई-वडील नाहीत, तो ऑफिस बॉय! कुठल्या तोंडाने परत जावे म्हणत १३ वर्षांची मुलगी गुजरातलाच थांबली

छत्रपती संभाजीनगर : इन्स्टाग्रामवरील आभासी जगाला भाळून अवघ्या १३ वर्षांची मुलगी एका गुजरातस्थित मुलाच्या प्रेमात पडली. एक दिवस तिने घर सोडून गुजरात गाठले. प्रत्यक्षात मुलाच्या घरी अठराविश्व दारिद्र्य होते. मात्र, पळून गेल्याने तिने आहे त्या परिस्थितीत त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. दीड वर्षांपासून पोलिस तिच्या शोधात होते. अखेर, भाऊबीजेला ते शहरात नातेवाइकांकडे येणार असल्याची माहिती प्राप्त होताच दोघांना ताब्यात घेतले. मुलीचा प्रियकर आकाशला अटक करून मुलीला कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले.

मुकुंदवाडी परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील १३ वर्षीय समीक्षा (नाव बदलले आहे) शालेय शिक्षण घेत होती. तिचे पालक खासगी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आईच्या मोबाइलवर इन्स्टाग्राम वापरताना तिची गुजरातच्या आकाशसोबत ओळख झाली. तो प्रभावित करणारे फोटो टाकत होता. कालांतराने ती त्याच्या प्रेमात पडली. त्यांच्यातील संवाद वाढत असतानाच ६ जानेवारी २०२४ रोजी समीक्षा अचानक बेपत्ता झाली. त्याच दिवशी तिने रात्री ट्रॅव्हल्सने सुरत गाठले. त्यानंतर दोघांनी एका चाळीत सोबत राहण्यास सुरुवात केली.

आई-वडीलही नाहीत, ऑफीस बॉय म्हणून कामइन्स्टावर आकर्षक फोटो टाकणारा आकाश प्रत्यक्षात एका चाळीत राहात होता. त्याच्या आई - वडिलांचे निधन झाले आहे. एका कंपनीत तो ऑफीस बॉय होता. समीक्षाचा भ्रमनिरास झाला. मात्र, पळून आल्याने कुठल्या तोंडाने परत जावे, या प्रश्नाने समीक्षाने त्याच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. इकडे मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तिच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तिचा शोध न लागल्याने ३ महिन्यानंतर गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाकडे वर्ग झाला. कक्षाच्या सहायक निरीक्षक जयश्री कुलकर्णी, अंमलदार विठ्ठल मानकापे, हिरा चिंचाेळकर, पुनम परदेशी, रामदास गव्हाणे सातत्याने समीक्षाच्या शोधात होते.

भावासोबत निनावी नावाने संपर्कातसमीक्षाला कुटुंबाची ओढ लागली होती. इन्स्टावर निनावी अकाउंट सुरू करून समीक्षा भावाच्या संपर्कात आली. ती सातत्याने त्याला पालकांविषयी प्रश्न विचारायची. ही बाब त्याला संशयास्पद वाटली. पोलिसांना ही बाब कळवताच पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे तिच्यावर पाळत ठेवली. प्रोफाइल समीक्षाचाच असल्याचे पोलिसांना कळाले होते. २३ ऑक्टोबर रोजी भाऊबीजेला दोघेही शहरात येऊन भावाला भेटण्याचा प्रयत्न करून निघून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पथकाने धाव घेत त्यांना ताब्यात घेतले. अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याने आकाशला अटक करण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Instagram Romance Scam: Teen Runs to Gujarat, Boyfriend an Office Boy

Web Summary : Lured by an Instagram romance, a 13-year-old girl fled to Gujarat. Her online lover, an office boy, lived in poverty. Police found them after a year and a half; the boy was arrested, and the girl returned home.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडिया