१३ जणांना विषबाधा
By Admin | Updated: April 1, 2015 01:05 IST2015-04-01T00:22:08+5:302015-04-01T01:05:01+5:30
औरंगाबाद : फुलेनगर, उस्मानपुरा येथे १० जणांना तर हर्सूल येथील एका वीटभट्टीवरील ३ महिलांना शिळी खिचडी खाल्ल्यानंतर विषबाधा झाली.

१३ जणांना विषबाधा
औरंगाबाद : फुलेनगर, उस्मानपुरा येथे १० जणांना तर हर्सूल येथील एका वीटभट्टीवरील ३ महिलांना शिळी खिचडी खाल्ल्यानंतर विषबाधा झाली. सर्वांना घाटी रु ग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
फुलेनगर उस्मानपुरा येथील रहिवासी शिंदे, बनकर आणि म्हस्के यांच्या नातेवाईकांच्या घरी सोमवारी विवाह समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या समारंभासाठी मसाला खिचडी बनविण्यात आली होती. त्यातील काही शिल्लक राहिली. लग्नघरातील मंडळींंनी घराजवळ राहणाऱ्या नातेवाईकांना ही खिचडी दिली. ऋषिकेश अंकुश शिंदे (३),परम लक्ष्मण शिंदे (३), अंकुश पंडित शिंदे (२५), कैलास पंडित शिंदे (२३), लक्ष्मी कडुबा बनकर (५०), कडुबा रामभाऊ बनकर (६०), राणी कडुबा बनकर (१८), नेहा पुंजाराम म्हस्के (१८), प्रेम पुंजाराम म्हस्के (७), प्रियंका पुंजाराम म्हस्के (४) यांनी ती सेवन केली.
त्यानंतर दुपारी ३ वाजेच्या सुमारास सर्वांना मळमळ, उलट्या आणि जुलाबांचा त्रास सुरू झाला. खिचडीमुळे हा त्रास सुरू झाल्याचे समजताच त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.