१३ शेळ्या लंपास
By Admin | Updated: March 19, 2015 23:54 IST2015-03-19T23:47:05+5:302015-03-19T23:54:54+5:30
उस्मानाबाद : शहरातील पुष्पक मंगल कार्यालय परिसरात चरण्यासाठी सोडलेल्या १३ शेळ्या चोरट्यांनी लंपास केल्या़ ही घटना बुधवारी दुपारी घडली असून

१३ शेळ्या लंपास
उस्मानाबाद : शहरातील पुष्पक मंगल कार्यालय परिसरात चरण्यासाठी सोडलेल्या १३ शेळ्या चोरट्यांनी लंपास केल्या़ ही घटना बुधवारी दुपारी घडली असून, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी सांगितले की, शहरातील तांबरी विभागातील भोसले हायस्कूल समोर राहणाऱ्या मंगल काळे या बुधवारी सकाळी त्यांच्या १३ शेळ्या चारण्यासाठी शहरातील बायपासनजीकच्या पुष्पक मंगल कार्यालय परिसरात गेल्या होत्या़ शेळ्या तेथे सोडून त्या जेवणासाठी आल्या असता अज्ञात चोरट्यांनी त्या शेळ्या चोरून नेल्या़ ही घटना मंगल काळे या परत गेल्यानंतर लक्षात आली़ या प्रकरणी संपत काळे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यांच्या ५० हजार रूपयांच्या १३ शेळ्या चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ काळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास पोना सोनार हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)