१३ भाविक जखमी

By Admin | Updated: May 12, 2014 00:02 IST2014-05-11T23:42:17+5:302014-05-12T00:02:25+5:30

श्रीक्षेत्र माहूर : तीर्थक्षेत्र माहूरगडावर दर्शनासाठी खाजगी तीन ट्रॅव्हल्सद्वारे येणार्‍या तीनही ट्रॅव्हल्सला घाटातून खाली उतरणार्‍या भरधाव टेम्पोने जोराची धडक दिली़

13 devotees injured | १३ भाविक जखमी

१३ भाविक जखमी

श्रीक्षेत्र माहूर : तीर्थक्षेत्र माहूरगडावर दर्शनासाठी खाजगी तीन ट्रॅव्हल्सद्वारे येणार्‍या तीनही ट्रॅव्हल्सला घाटातून खाली उतरणार्‍या भरधाव टेम्पोने जोराची धडक दिली़ अपघातात तिन्ही ट्रॅव्हल्समधील १३ भाविक गंभीर जखमी झाले़ ही घटना माहूर घाटाखालील पैनगंगा नदी किनार्‍यावरील सेवालाल मंदिरासमोर ११ मे रोजी सकाळी ५ वाजता घडली़ सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील टाकळी व गार अकोली येथील ४० ते ४२ भाविकांनी दर्शनासाठी खाजगी ट्रॅव्हल्स भाड्याने घेवून तीर्थप्रवास सुरू केला़ माहूर गडावर चढण्याआधी पैनगंगा नदीत स्नान करून जावे या हेतूने नदी किनार्‍यावरील सेवालालनगर येथे मुख्य रस्त्याच्या कडेला तीनही ट्रॅव्हल्स थांबविण्यात आल्या़ पहाटे ५ वाजता ट्रॅव्हल्स थांबवून ५़३० वाजता वाहनाखाली भाविक उतरत असताना आदिलाबाद येथून कापूस खाली करून येत असलेला निवघा ता़ हदगाव येथील टेम्पो क्ऱ टाटा-९०९, क्ऱएम़एच़२६-ए़डी़ ००४५ यातील चालकाचा डोळा लागला़ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्स क्ऱ एम़एच़२३-ई-६१०९ याला जबर धडक दिली़ त्यामुळे त्याच्यामागे उभी असलेली दुसरी ट्रॅव्हल्स क्ऱएम़एच़२३-ई-७६८९ यास जबर धडक बसली़ त्या ट्रॅव्हल्सने तिच्या मागे उभ्या असलेल्या तिसरी ट्रॅव्हल्स क्ऱ एम़एच़२३-ई- ९९४५ ला धडक दिल्याने तिन्ही ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले़ यात बसलेल्या भाविकांना मोठी दुखापत झाली़ यात टाकळी व गारअकोली ता़माडा, जि़सोलापूर येथील कुंडलिक मनोहर माने (वय ४५), तुकाराम विष्णू देवकते (वय ५२), श्रीकांत देवराव बिचकुले (वय ६०), सिंधुबाई अशोकराव भोसले (वय ५५), रुक्मिनाबाई नवनाथ कोकाटे (वय ५५), साधू मनोहर माने (५५), तुकाराम देवराव बिचकुले (६२), मंगला रामदास गाडगे (४०), अशोकराव नामदेव भोसले (६६), सोपान देवराव बिचकुले (५५), तुकाराम दशरथ पाटील (४८), भारत बाबुराव सुळ (५०), वेदांत तानाजी देशमुख (८०) यांचा जखमींत समावेश आहे़ वैद्यकीय अधिकारी डॉ़निरज कुंभार यांनी शुभांगी ठाकरे, वर्षा केंद्रे, अकबर भाई, सदानंद कुºहा, भाग्यवंत जाधव यांच्या मदतीने उपचार केले व काही रुग्णांना नांदेड येथेही हलविण्यात आले़ (वार्ताहर) गस्तीवरील पोलिसांची दक्षता रात्री गस्तीवर असलेले पो़नि़ डॉ़ अरूण जगताप, पोलिस उपनिरीक्षक बीक़े़ सानप हे सहकार्‍यांसह या ठिकाणी आले. आरडाओरड ऐकून घटनास्थळाकडे धाव घेवून समोरील दृश्य पाहून तत्काळ ग्रामीण रुग्णालयात फोन करून रुग्णवाहिका मागविली व पोलिस वाहनात शक्य तितक्या जखमींना रुग्णालयात हलविले़

Web Title: 13 devotees injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.