१२८ ग्रा. पं. च्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर
By Admin | Updated: June 16, 2017 23:29 IST2017-06-16T23:25:16+5:302017-06-16T23:29:15+5:30
परभणी : जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतीची आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ दरम्यान मुदत संपत आहे

१२८ ग्रा. पं. च्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतीची आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ दरम्यान मुदत संपत आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून निवडणूक विभागाच्या वतीने प्रभागरचना तयार करण्यास सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतीची मुदत आॅक्टोबर २०१७ ते आॅक्टोबर २०१८ दरम्यान संपत आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने १५ जूनपासून या ग्रामपंचायतींची गुगल मॅपद्वारे प्रभाग रचना सुरु केली आहे. २१ जूनपर्यंत त्या त्या ग्रामपंंचायतीमध्ये तलाठी व ग्रामसेवक ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये प्रभाग रचना तयार करण्यात येत आहे. त्यानंतर ४ ते ११ जुलैदरम्यान तयार केलेल्या प्रभागरचनेवर हरकती मागविण्यात येणार आहेत. तसेच १५ ते २५ जुलैदरम्यान आलेल्या हरकतींवर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुनावणी होणार आहे. त्यानंतर ३ आॅगस्ट रोजी अंतिम प्रभागरचना जाहीर होणार आहे.