महास्वच्छता अभियानात उचलला १२५ टिप्पर मलबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:12 AM2018-05-28T01:12:09+5:302018-05-28T01:12:33+5:30

महापालिकेच्या सहकार्याने औरंगाबाद डेव्हलपमेंट फोरमतर्फे २६ आणि २७ मे रोजी शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात नागरिक, सेवाभावी संस्था आणि ग्रुपने सहभाग नोंदविला.

125 Tippers debris lifted in the campaign | महास्वच्छता अभियानात उचलला १२५ टिप्पर मलबा

महास्वच्छता अभियानात उचलला १२५ टिप्पर मलबा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेच्या सहकार्याने औरंगाबाद डेव्हलपमेंट फोरमतर्फे २६ आणि २७ मे रोजी शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात नागरिक, सेवाभावी संस्था आणि ग्रुपने सहभाग नोंदविला. या दोन दिवसांत तब्बल १२५ टिप्पर मलबा जमा केला असल्याची माहिती औरंगाबादचे स्वच्छतादूत भगतसिंग दरख यांनी रविवारी (दि.२७) पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी दरख म्हणाले, नोव्हेंबर-२०१७ मध्ये आम्ही ‘डस्ट फ्री औरंगाबाद’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रयत्न करीत होतो. पायलट प्रोजेक्ट म्हणून वरद गणेश मंदिर ते लक्ष्मण चावडी या रस्त्याची निवड केली. या उपक्रमात चांगले यश मिळाले. रस्त्याच्या बाजूला असलेल्या १५०० झाडांना आणि विजेच्या खांबांना रंगरंगोटी करून सुशोभीकरण केले. आता महापालिकेच्या सहकार्याने २६ आणि २७ मे रोजी संपूर्ण शहर ‘डस्ट फ्री’ करण्याच्या उद्देशाने महास्वच्छता अभियान राबविले. यासाठी महापालिकेने ९ जेसीबी आणि २६ टिप्पर देऊन सहकार्य केले. पहिल्या दिवशी ६०, तर दुसऱ्या दिवशी ६५ असे एकूण १२५ टिप्पर इतका मलबा जमा केला. नागरिक आणि संस्थांच्या पुढाकाराने हे अभियान यशस्वी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापुढेही सामाजिक उपक्रम सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला फोरमचे संदीप नागोरी, रवी भट्टड उपस्थित होते.
मागील काही दिवसांपासून कचरा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा स्तुत्य उपक्रमामुळे महापालिकेचा उत्साह यानिमित्ताने वाढत आहे. विविध संस्थांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याचीे गरज असल्याचे मनपातर्फे कळविण्यात आले.

Web Title: 125 Tippers debris lifted in the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.