लोअर दूधना प्रकल्पाच्या कामासाठी १२२ कोटी मंजूर
By Admin | Updated: March 13, 2016 14:49 IST2016-03-13T14:46:10+5:302016-03-13T14:49:55+5:30
परभणी : सेलू तालुक्यातील लोअर दूधना प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी चालू अर्थसंकल्पात १२२ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती आ़ राहुल पाटील यांनी दिली़

लोअर दूधना प्रकल्पाच्या कामासाठी १२२ कोटी मंजूर
परभणी : सेलू तालुक्यातील लोअर दूधना प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी चालू अर्थसंकल्पात १२२ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती आ़ राहुल पाटील यांनी दिली़
लोअर दूधना प्रकल्पात सध्या ४५ टक्के पाणीसाठा आहे़ यामुळे परिसरातील हजारो हेक्टर शेतीला फायदा झाला आहे़ धरण पूर्ण झाल्यास जालना व परभणी जिल्ह्यातील ५३ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे़ यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना प्रत्यक्ष भेटून ६५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी आ. पाटील यांनी केली होती़ तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्याशीही चर्चा करून तांत्रिक बाबींची पूर्तता करीत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता़ विधानसभेत झालेल्या चर्चेत लोअर दूधनाच्या पूर्णत्वाचा प्रश्न उपस्थित करून जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे लक्ष वेधले होते़ त्यामुळे चालू अर्थसंकल्पात लोअर दूधना प्रकल्पातील विकास कामे करण्यासाठी १२२ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी दिली़ (प्रतिनिधी)