१२ सौरदिवे बंद पडले

By Admin | Updated: June 23, 2014 00:24 IST2014-06-22T23:29:23+5:302014-06-23T00:24:43+5:30

नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील दलित वस्तीत १२ सौर उर्जेचे दिवे लावले होते.

12 solar lights were closed | १२ सौरदिवे बंद पडले

१२ सौरदिवे बंद पडले

नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील दलित वस्तीत १२ सौर उर्जेचे दिवे लावले होते. सध्या ते पुर्णपणे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
नर्सीतील अत्यंत मागासलेला भाग असलेल्या दलितवस्तीत समाज कल्याण कार्यालयामार्फत सौर उर्जेचे दिवे देण्यात आले होते. गल्लीतील महत्वाच्या ठिकाणी खांब उभे करून त्यावर सौर उर्जेचे दिवे लावण्यात आले. त्यावर अडीच लाखांहून अधिक खर्च झालेला आहे. त्याची ५ वर्षाची वॉरंटी देण्यात आली होती; परंतु केवळ ३ महिन्यात हे लाईट पुर्णपणे बंद पडले असून या भागात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या विषयी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक जे. बी. घुगे यांना विचारले असता, हा फंड कोठून आला? हे काम कोणी केले? या विषयी ग्रामपंचायतीमध्ये कुठलीच नोंद नाही, असे त्यांनी सांगितले. आता हे लाईट बंद पडल्याची चौकशी कुठे करावी ही चिंता बापुराव इंगोले, कपील धबडगे, बबन सावंत, दत्ता पाटील यांना वाटत आहे. (वार्ताहर)

Web Title: 12 solar lights were closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.