मिनी बायपाससाठी १२ कोटी
By Admin | Updated: June 29, 2014 00:35 IST2014-06-29T00:29:57+5:302014-06-29T00:35:57+5:30
बीड: आनंदवाडी- बहीरवाडी- एमआयडीसी या मिनी बायपास रस्त्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून १० तर जिल्हा नियोजन मंडळातून २ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.

मिनी बायपाससाठी १२ कोटी
बीड: आनंदवाडी- बहीरवाडी- एमआयडीसी या मिनी बायपास रस्त्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून १० तर जिल्हा नियोजन मंडळातून २ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. या रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शनिवारी दिल्या.
क्षीरसागर यांनी या रस्ता कामाची शनिवारी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता वसंत बाविस्कर, सरपंच बाजीराव बोबडे, मल्हार सेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू देवकते, सुधाकर राऊत उपस्थित होते. बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर दुभाजक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सव्वाकोटी रुपये निधी मंजूर केला आहे. मिनी बायपासमुळे अपघाताला आळा बसेल. काम वेगाने पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)