शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

११६ तंटामुक्त गावांना प्रशस्तीपत्रकाची प्रतीक्षा !

By admin | Updated: March 26, 2015 00:56 IST

लातूर : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत प्रत्येक गावांमध्ये शांतता व सुव्यवस्था रहावी, या दृष्टिकोनातून २००५ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू करण्यात आली

लातूर : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत प्रत्येक गावांमध्ये शांतता व सुव्यवस्था रहावी, या दृष्टिकोनातून २००५ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत लातूर जिल्ह्यात तंटामुक्त मोहिमेला गती आली. लातूर जिल्ह्यातील ७८७ गावांतील तंटामुक्त समित्यांच्या कामामुळे सर्व गावे तंटामुक्त झाली. त्यांना पारितोषिकही मिळाले. परंतु, २००९-१० ते २०१०-११ या कालावधीत तंटामुक्त झालेल्या ११६ गावांना पारितोषिकाची रक्कम मिळाली. परंतु, गृहमंत्र्यांच्या स्वाक्षरीने मिळणारे प्रशस्तीपत्रक मात्र अद्यापही मिळाले नसल्याने या गावातील तंटामुक्त समित्यांना प्रशस्तीपत्रकाची प्रतीक्षा लागली आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत लातूर जिल्ह्यात ७८७ गावांमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत समित्यांची स्थापना करण्यात आली. या मोहिमेला गती मिळावी या दृष्टिकोनातून प्रबोधनासाठी खंडू पवार लिखित ‘बिन भानगडीचं गाव’ हे नाटकही गावोगाव दाखवून तंटामुक्तीला गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहिल्या टप्प्यात ६७१ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना पुरस्काराच्या रकमेसह प्रशस्तीपत्रकही मिळाले. परंतु, त्यानंतर २००९-१० मध्ये १०५ गावे तंटामुक्त झाली. त्यांना ३ कोटी ७२ लाख रुपयांचे पारितोषिकही मिळाले. तसेच २०१०-११ मध्ये ११ गावे तंटामुक्त झाली. या गावांना ५२ लाखांची पारितोषिके मिळाली. परंतु, या पारितोषिकांबरोबर शाबासकीची थाप म्हणून गृहमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्रक त्या-त्या तंटामुक्त समितीला देणे आवश्यक होते. परंतु, अद्यापही ते प्रशस्तीपत्रक मिळालेले नाही. त्यामुळे त्या गावांनी गाव तंटामुक्त केले. याचा सबळ पुरावा त्यांच्याकडे मात्र अद्यापही मिळालेला नाही. (प्रतिनिधी)